हॉकी मानांकनात भारताची घसरण

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरूष आणि महिलांच्या सांघिक मानांकनात भारताची घसरण झाली आहे. मंगळवारी ताजी मानांकन यादी जाहीर करण्यात आली आणि त्यामध्ये पुरूषांच्या विभागात भारताने चौथे स्थान तर महिलांच्या विभागात नववे स्थान मिळविले आहे. पुरूषांच्या विभागात जर्मनीने भारताला मागे खेचत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पात्रफेरी स्पर्धेमध्ये जर्मनी संघाची कामगिरी भारताच्या […]

हॉकी मानांकनात भारताची घसरण

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरूष आणि महिलांच्या सांघिक मानांकनात भारताची घसरण झाली आहे. मंगळवारी ताजी मानांकन यादी जाहीर करण्यात आली आणि त्यामध्ये पुरूषांच्या विभागात भारताने चौथे स्थान तर महिलांच्या विभागात नववे स्थान मिळविले आहे. पुरूषांच्या विभागात जर्मनीने भारताला मागे खेचत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली.
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पात्रफेरी स्पर्धेमध्ये जर्मनी संघाची कामगिरी भारताच्या तुलनेत अधिक दर्जेदार झाली. या ताज्या मानांकन यादीत भारताने 2761 मानांकन गुण घेत चौथे स्थान मिळविले आहे. गेल्यावर्षी आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याने भारतीय पुरूष हॉकी संघ येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिंम्पिकसाठी थेट पात्र ठरला आहे. जर्मनी 2786 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ओमानमध्ये झालेल्या ऑलिंम्पिक पात्रफेरीच्या स्पर्धेत जर्मनीने 2 सामने जिंकले असून 2 सामने बरोबरीत राखले. पुरूषांच्या ताज्या मानांकन यादीत नेदरलँडस्चा संघ 3060 मानांकन गुणांसह महिल्या स्थानावर असून बेल्जियम 2848 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 2757 गुणांसह 5 व्या स्थानावर आहे. इंग्लंड 2720 गुणांसह 6 व्या स्थानावर आहे. अर्जेंटिनाने 7 वे तर स्पेनने 8 वे स्थान मिळविले आहे. न्यूझीलंडने मात्र या मानांकन यादीतील पहिल्या 10 संघात स्थान पटकाविले आहे. या यादीत न्यूझीलंड 2025 गुणांसह 10 व्या स्थानावर आहे.
महिलांच्या सांघिक हॉकी ताज्या मानांकन यादीत भारताला नवव्या स्थानावर समाधान मानावे लागत आहे. भारतीय महिला हॉकी संघ पॅरिस ऑलिंम्पिकसाठी पात्र ठरू शकला नाही. या विभागात नेदरलँडस्ने 3422 गुणांसह पहिले स्थान मजबूत केले आहे. अर्जेंटिना 2827 गुणांसह दुसऱ्या तर जर्मनी 2732 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 2678 गुणांसह चौथ्या, बेल्जियम 2499 गुणांसह पाचव्या, इंग्लंड 2304 गुणांसह 6 व्या, स्पेन 2244 गुणांसह सातव्या स्थानावर आहे.