युक्रेन युद्धक्षेत्रात अडकलेले भारतीय लवकरच मायदेशी?
एस. जयशंकर यांची रशियन परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा
वृत्तसंस्था/ शांघाय
रशिया आणि युक्रेनमध्ये दोन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय अजूनही तेथे अडकून पडले आहेत. त्यांना सुखरूप मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यान, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी युद्धक्षेत्रात उपस्थित असलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली आहे. या चर्चेदरम्यान त्यांनी रशिया-युव्रेन युद्धक्षेत्रात उपस्थित असलेल्या भारतीयांचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्या सुरक्षित परतीची खात्री करण्याची विनंती केली.
शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) वार्षिक शिखर परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर मंगळवारी येथे आले. याचदरम्यान त्यांनी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी ‘एक्स’वर भेटीसंबंधीची माहिती देत लावरोव्ह यांना भेटून आनंद झाल्याचे म्हटले आहे. द्विपक्षीय भागीदारी आणि समकालीन मुद्यांवर आम्ही व्यापक चर्चा केली. डिसेंबर 2023 मध्ये आमच्या शेवटच्या बैठकीपासून अनेक क्षेत्रात झालेल्या प्रगतीवर चर्चा केली, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या भेटीमध्ये सध्या युद्धक्षेत्रात असलेल्या भारतीय नागरिकांबद्दल आपण गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांच्या सुरक्षित आणि लवकर परतण्यावर भर दिला. त्यांनी या भेटीची छायाचित्रेही पोस्ट केली आहेत. त्यांनी लावरोव्ह यांच्याशी जागतिक धोरणात्मक परिस्थितीवरही चर्चा केली. दोन्ही परराष्ट्रमंत्र्यांमधील ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या प्रस्तावित दौऱ्यापूर्वीची महत्त्वपूर्ण भेट मानली जात आहे.
परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी मंगळवारी येथे कझाकस्तानचे उपपंतप्रधान मुरात नुरतलेउ यांची भेट घेतली आणि धोरणात्मक भागीदारीचा विस्तार आणि मध्य आशियासोबत विविध स्वरूपांमध्ये भारताच्या वाढत्या सहभागावर चर्चा केली. जयशंकर यांनी प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर नुरतालेओ यांच्याशी विचार विनिमय केला. नुरतलेउ यांच्याकडे परराष्ट्र मंत्रिपदाची जबाबदारीही आहे.
Home महत्वाची बातमी युक्रेन युद्धक्षेत्रात अडकलेले भारतीय लवकरच मायदेशी?
युक्रेन युद्धक्षेत्रात अडकलेले भारतीय लवकरच मायदेशी?
एस. जयशंकर यांची रशियन परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा वृत्तसंस्था/ शांघाय रशिया आणि युक्रेनमध्ये दोन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय अजूनही तेथे अडकून पडले आहेत. त्यांना सुखरूप मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यान, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी युद्धक्षेत्रात उपस्थित असलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली आहे. या चर्चेदरम्यान त्यांनी रशिया-युव्रेन युद्धक्षेत्रात उपस्थित […]