भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षक शॉपमन यांचा राजीनामा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षक जॅनेके शॉपमन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रीय महासंघाला त्यांच्याविषयी कदर आणि आदर नसल्याची टीका करून खळबळ उडवून दिल्यानंतर काही दिवसांनी ही घडामोड पुढे आली आहे. या डच प्रशिक्षकाने 2021 मध्ये स्जोर्ड मरिन यांच्याकडून महिला संघाची सूत्रे हाती घेतली होती. मरिन यांच्या काळात टोकियो ऑलिम्पिकमध्ये […]

भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षक शॉपमन यांचा राजीनामा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षक जॅनेके शॉपमन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रीय महासंघाला त्यांच्याविषयी कदर आणि आदर नसल्याची टीका करून खळबळ उडवून दिल्यानंतर काही दिवसांनी ही घडामोड पुढे आली आहे.
या डच प्रशिक्षकाने 2021 मध्ये स्जोर्ड मरिन यांच्याकडून महिला संघाची सूत्रे हाती घेतली होती. मरिन यांच्या काळात टोकियो ऑलिम्पिकमध्ये संघाने ऐतिहासिक चौथे स्थान मिळविले होते. शॉपमन यांचा करार पॅरिस ऑलिम्पिकनंतर या वर्षी ऑगस्टमध्ये संपणार होता. परंतु त्यांच्या अलीकडील गंभीर टिप्पण्यांनंतर त्या पदावर राहणार नाहीत अशी अपेक्षा होती.
हॉकी इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, या 46 वर्षीय प्रशिक्षकाने ओडिशामधील हॉकी प्रो लीगच्या होम लेगमध्ये संघ बाहेर पडल्यानंतर हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांच्याकडे राजीनामा दिला. नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजीनाम्यामुळे महिला हॉकी संघाला 2026 मधील पुढील महिला विश्वचषक स्पर्धा आणि 2028 चे लॉस एंजेलिस ऑलिम्पिक यांच्यासाठी तयार करू शकेल असा योग्य मुख्य प्रशिक्षक शोधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे हॉकी इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे. आमच्या केंद्रस्थानी खेळाडूंची प्रगती असल्याने भारतीय महिला हॉकीमध्ये नवीन अध्याय सुरू करण्याची वेळ आली आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.