भारतीय महिला तिरंदाजी संघ दुसऱ्या स्थानी

वृत्तसंस्था/ येचॉन (दक्षिण कोरिया) येथे सुरु असलेल्या पात्र फेरीच्या मानांकन विश्वचषक तिरंदाजी स्टेज 2 स्पर्धेत  भारतीय महिला तिरंदाजी संघाने सांघिक कंपाऊंड प्रकारात दुसरे स्थान मिळविले. भारतीय संघातील तिरंदाजपटू तसेच विद्यमान आशियाई स्पर्धेतील चॅम्पियन ज्योती सुरेखा व्हेन्नमने मानांकनात चौथे स्थान मिळविले. गेल्या महिन्यात झालेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या शांघाय येथील टप्प्यात भारतीय महिला तिरंदाजपटूंनी दर्जेदार कामगिरी करत […]

भारतीय महिला तिरंदाजी संघ दुसऱ्या स्थानी

वृत्तसंस्था/ येचॉन (दक्षिण कोरिया)
येथे सुरु असलेल्या पात्र फेरीच्या मानांकन विश्वचषक तिरंदाजी स्टेज 2 स्पर्धेत  भारतीय महिला तिरंदाजी संघाने सांघिक कंपाऊंड प्रकारात दुसरे स्थान मिळविले. भारतीय संघातील तिरंदाजपटू तसेच विद्यमान आशियाई स्पर्धेतील चॅम्पियन ज्योती सुरेखा व्हेन्नमने मानांकनात चौथे स्थान मिळविले.
गेल्या महिन्यात झालेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या शांघाय येथील टप्प्यात भारतीय महिला तिरंदाजपटूंनी दर्जेदार कामगिरी करत सुवर्णपदकांची हॅट्ट्रीक साधली होती. या कामगिरीनंतर भारताची महिला तिरंदाजपटू ज्योती सुरेखा व्हेन्नमने सातत्याने चांगली कामगिरी केली. त्यामुळे तिने मानांकनात चौथे स्थान मिळविले. ज्योतीचे मानांकनातील पहिल्या 3 क्रमांकातील स्थान केवळ 3 गुणानी हुकले. या मानांकनात हेन सेयुंगऑनने 711 गुणासह पोल पोझिशन पटकाविले. दक्षिण कोरियाची युहुनने 707 शॉट्ससह दुसरे स्थान घेतले. महिलांच्या सांघिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात दक्षिण कोरियाने पहिले स्थान मिळविले. भारताने स्टेज 1 विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत 5 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्यपदकासह पहिले स्थान मिळविले होते. तर दक्षिण कोरियाला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.