भारतीय संघाला बांगलादेशकडून धक्का

वृत्तसंस्था/ कोलकाता बांगलादेशने दक्षिण आशियाई विभागातील सर्व वयोगटांतील सर्वोत्कृष्ट महिला संघ म्हणून त्यांची प्रतिष्ठा कायम ठेवताना सॅफ 16 वर्षांखालील महिलांच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहज आणि लवकर प्रवेश मिळवण्याच्या भारताच्या आशांना मोठा धक्का दिला. दोन्ही संघांनी त्यांच्या मोहिमेची विजयी सुऊवात केली होती. बीबी थॉमसकडून  प्रशिक्षित भारतीय संघाने सलामीच्या लढतीत भूतानला हरवताना दाखविलेला वेग राखण्यात त्यांना अपयश […]

भारतीय संघाला बांगलादेशकडून धक्का

वृत्तसंस्था/ कोलकाता
बांगलादेशने दक्षिण आशियाई विभागातील सर्व वयोगटांतील सर्वोत्कृष्ट महिला संघ म्हणून त्यांची प्रतिष्ठा कायम ठेवताना सॅफ 16 वर्षांखालील महिलांच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहज आणि लवकर प्रवेश मिळवण्याच्या भारताच्या आशांना मोठा धक्का दिला.
दोन्ही संघांनी त्यांच्या मोहिमेची विजयी सुऊवात केली होती. बीबी थॉमसकडून  प्रशिक्षित भारतीय संघाने सलामीच्या लढतीत भूतानला हरवताना दाखविलेला वेग राखण्यात त्यांना अपयश आले आणि काठमांडूनजीक ललितपूर येथील एएनएफए कॉम्प्लेक्स मैदानावर कट्टर प्रतिस्पर्ध्यांविऊद्ध 1-3 असा पराभव पत्करावा लागला. काठमांडू, मंगळवार. असाहाय्य भूतानला 7-0 ने पराभूत करताना क्वचितच दबावाखाली आलेला युवा भारतीय संघाचा बचाव बांगलादेशच्या आव्हानांचा सामना करू शकला नाही. कारण पहिले दोन गोल हे गोलरक्षणातील त्रुटी आणि बचावातील चुकांमुळे झाले.
सुऊवातीचा 9 व्या मिनिटाला झालेला गोल हा तो नोंदविणारी खेळाडू अल्पी अख्तरलाही आश्चर्यचकीत करणारा ठरला. गोलरक्षक सूरजमुनी कुमारी हिने यावेळी योग्य दिशेने उडी मारली होती, परंतु ती चेंडू अडवू शकली नाही. त्यानंतर, धक्का बसलेल्या भारताने आक्रमणात वाढ करण्यास सुऊवात केली. उत्तरार्धात भारताने जोरदार पुनरागमन केले आणि मागील सामन्यातील ‘हॅट्ट्रिक गर्ल’ अनुष्का कुमारीने 55 व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली. पण 79 व्या मिनिटाला बांगलादेशने पुन्हा आघाडी मिळवल्यामुळे भारताचा आनंद कमी झाला. त्यानंतर त्यांची कर्णधार अर्पिता बिस्वास हिने 10 मिनिटांनी कॉर्नरवर गोल केल्यावर भारताला मोठा धक्का बसला.
या विजयाने बांगलादेशला चार संघांमध्ये अव्वल स्थान मिळवून दिले आहे आणि अंतिम फेरीतील त्यांचे स्थान जवळपास निश्चित केले आहे,. तर भारताला अंतिम  लढतीतील स्थान निश्चित करण्यासाठी यजमान नेपाळविऊद्धच्या लढतीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.