भारतीय स्क्वॅश संघाचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
होस्टनमध्ये सुरू असलेल्या विश्व कनिष्टांच्या सांघिक स्क्वॅश स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. मुले आणि मुलींच्या विभागात भारतीय संघाला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला.
मुलांच्या विभागातील झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात द. कोरियाने भारताचा 2-1 असा पराभव केला. या लढतीमध्ये भारताच्या युवराज वाधवानीने आपला सामना जिंकला. पण त्यानंतर शौर्या बावा आणि अरिहंत के.एस. यांना आपले सामने गमवावे लागले. मुलींच्या विभागातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मलेशियाने भारतावर 2-1 अशी मात केली. भारतीय संघातील अनहात सिंगने आपला सामना जिंगला. पण शमीना रियाज व निरुपमा दुबे यांनी आपले सामने गमविले.
Home महत्वाची बातमी भारतीय स्क्वॅश संघाचे आव्हान समाप्त
भारतीय स्क्वॅश संघाचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/नवी दिल्ली होस्टनमध्ये सुरू असलेल्या विश्व कनिष्टांच्या सांघिक स्क्वॅश स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. मुले आणि मुलींच्या विभागात भारतीय संघाला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. मुलांच्या विभागातील झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात द. कोरियाने भारताचा 2-1 असा पराभव केला. या लढतीमध्ये भारताच्या युवराज वाधवानीने आपला सामना जिंकला. पण त्यानंतर शौर्या बावा आणि अरिहंत के.एस. यांना […]