नेमबाजीत पदकांचा दुष्काळ संपविण्यात भारतीय नेमबाज सज्ज

ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले भारतीय नेमबाज. वृत्तसंस्था/चॅटेरॉक्स (फ्रान्स) 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजी या क्रीडा प्रकाराला शनिवारपासून येथे प्रारंभ होत आहे. नेमबाजी या क्रीडा प्रकारात गेली तब्बल 12 वर्षे भारताला एकही पदक मिळवता आलेले नाही. दरम्यान यावेळी या क्रीडा प्रकारासाठी भारताचे 21 जणांचे नेमबाजी पथक पदकांचा दुष्काळ संपविण्यासाठी प्रयत्न करेल. भारताने ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये आतापर्यंत एकूण […]

नेमबाजीत पदकांचा दुष्काळ संपविण्यात भारतीय नेमबाज सज्ज

ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले भारतीय नेमबाज.
वृत्तसंस्था/चॅटेरॉक्स (फ्रान्स)
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजी या क्रीडा प्रकाराला शनिवारपासून येथे प्रारंभ होत आहे. नेमबाजी या क्रीडा प्रकारात गेली तब्बल 12 वर्षे भारताला एकही पदक मिळवता आलेले नाही. दरम्यान यावेळी या क्रीडा प्रकारासाठी भारताचे 21 जणांचे नेमबाजी पथक पदकांचा दुष्काळ संपविण्यासाठी प्रयत्न करेल.
भारताने ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये आतापर्यंत एकूण 35 पदके मिळविली असून त्यापैकी चार पदके नेमबाजीत घेतली आहेत. यापूर्वी रिओ डे जेनेरिओ आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये नेमबाजी या क्रीडा प्रकारात भारतीय नेमबाजांना पदकविना परतावे लागले होते. ऑलिम्पिकमधील नेमबाजी हा एक महत्वाचा क्रीडा प्रकार ओळखला जातो. या क्रीडा प्रकारासाठी भारताच्या नेमबाजी फेडरेशनने 21 सदस्यांचा संघ निवडला आहे. पुरूषांच्या 10 मीटर एअर राफल नेमबाजीत संदीप सिंग आणि रुद्रांक्ष पाटील भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहे.
अॅथेलेटिक्स या क्रीडा प्रकारात सहभागी होणाऱ्या अॅथलिटससाठी पॅरिस शहरापासून थोड्या दूर अंतरावर असलेल्या परिसरात सरावाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी विविध देशांचे अॅथलिटस् सराव करीत आहे. मनु भाकर, ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर, अंजुम मोदगिल व इलावेनिल वलरिवन हे पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होत आहेत. या स्पर्धेतील  नेमबाजी क्रीडा प्रकारातील 15 विविध गटामध्ये भारताचे नेमबाज सहभागी होत आहेत. नेमबाजी या क्रीडा प्रकारात भारताला यावेळी चीनकडून कडवे आव्हान अपेक्षित आहे. चीनचे 21 जणांचे नेमबाजी पथक येथे दाखल झाले आहेत. 2012 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत कास्यपदक मिळविणारे गगन नारंग हे पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय नेमबाजी पथकाचे प्रमुख आहेत.
नेमबाजी या क्रीडा प्रकारातील पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल नेमबाजीसाठी संदीप सिंग, अर्जुन बबुटा, महिलांच्या 10 मीटर एअर रायफल नेमबाजीत इलावेनिल वलरिवन व रमिता जिंदाल, महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझीशनमध्ये सिफ्ट कौर सामरा, अंजुम मोदगिल, पुरूषांच्या 50 मी. रायफल थ्री पोझीशनमध्ये ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर, स्वप्नील कुसाळे, 10 मी. रायफल नेमबाजीत मिश्र सांघिक प्रकारात संदीपसिंग/इलावेनिल वलरिवन, अर्जुन बबुटा/रमिता जिंदाल, पिस्तुल नेमबाजीत-पुरूषांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत सरबज्योत सिंग, अर्जुन चिमा, महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत मनु भाकर, रिदम सांगवान, पुरूषांची 25 मी. रॅपिड फायर पिस्तुल नेमबाजी-अनिष भनवाला, विजयवीर सिधू, महिलांची 25 मी. पिस्तुल नेमबाजी-मनु भाकर, इशा सिंग, 10 मी. एअर पिस्तुल मिश्र सांघिक-सरबज्योत सिंग/मनु भाकर, अर्जुनसिंग चीमा/रिदम सांगवान, शॉटगन नेमबाजी-पुरूषांची ट्रॅप नेमबाजी पृथ्वीराज तोंडाईमन, महिलांची ट्रॅप नेमबाजी राजेश्वरी कुमारी, श्रेयांशी सिंग, पुरूषांची स्किट नेमबाजी- अनंतजितसिंग नरुका, महिलांची स्किट नेमबाजी- माहेश्वरी चौहान, रजिया धिल्लाँ, स्किट मिश्र सांघिक नेमबाजीत-अनंतजित सिंग नरुका/माहेश्वरी चौहान यांचा समावेश आहे.