भारतीय कर्मचाऱ्यांना कॅनडाने हटवले?

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली कॅनडाने भारतातील आपल्या राजनैतिक मिशनमधून अनेक भारतीय कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. याशिवाय मुंबई, चंदीगड आणि बेंगळूर येथील पॅनडाच्या वाणिज्य दुतावासातील सर्व कर्मचाऱ्यांनाही काढून टाकण्यात आले आहे. भारताने कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे पॅनडा उच्चायुक्तालयाच्या जनसंपर्क कार्यालयाने सांगितले. तथापि, पॅनडाने किती भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे, हे उघड […]

भारतीय कर्मचाऱ्यांना कॅनडाने हटवले?

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कॅनडाने भारतातील आपल्या राजनैतिक मिशनमधून अनेक भारतीय कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. याशिवाय मुंबई, चंदीगड आणि बेंगळूर येथील पॅनडाच्या वाणिज्य दुतावासातील सर्व कर्मचाऱ्यांनाही काढून टाकण्यात आले आहे. भारताने कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे पॅनडा उच्चायुक्तालयाच्या जनसंपर्क कार्यालयाने सांगितले. तथापि, पॅनडाने किती भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे, हे उघड झालेले नाही. तथापि, ते 100 पेक्षा कमी असल्याचे समजते.
गेल्यावषी भारताने पॅनडाला आपल्या 41 मुत्सद्दींना परत बोलावण्यास सांगितले होते. दोन्ही देशांच्या राजनयिकांची संख्या समान करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून भारतात उपस्थित असलेले कॅनडाचे अतिरिक्त मुत्सद्दी आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करतात, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते. मात्र, आता कॅनडाने आपली भूमिका मांडताना आम्ही भारतात आमच्या नागरिकांना सेवा देणे सुरूच ठेवू. कॅनडात शिकण्यासाठी, काम करण्यासाठी किंवा राहण्यासाठी भारतीय नागरिकांचे स्वागतही आम्ही करत राहू, असे उच्चायुक्तांनी सांगितले.