भारतीय अर्थव्यवस्था सुसाट
चालू आर्थिक वर्षात 7.3 टक्के दराने विकास शक्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशाची अर्थव्यवस्था 7.3 टक्के दराने वाढू शकते, असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) वर्तवला आहे. चालू वर्षात भारताचा जीडीपी 296.58 लाख कोटी रुपये (3,570 अब्ज डॉलर्स) असण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. गेल्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचा विकासदर 7.2 टक्के होता. डिसेंबरमध्ये मध्यवर्ती रिझर्व्ह बँकेने जीडीपी वाढीचा आपला पूर्वीचा अंदाज 6.5 टक्क्मयांवरून 7 टक्क्मयांवर नेला होता.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने मार्चमध्ये संपणाऱ्या चालू आर्थिक वर्षातील वाढीबाबत शुक्रवारी जाहीर केलेल्या पहिल्या आगाऊ अंदाजानुसार अर्थव्यवस्था तेजीत राहण्याचे संकेत मिळत आहेत. सध्याच्या किंमतींवर भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर आर्थिक वर्ष 2022-23 मधील 16.1 टक्क्मयांच्या तुलनेत 2023-24 मध्ये 8.9 टक्के राहण्याची शक्मयता आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात सध्याच्या किंमतींवर जीडीपी वाढीचा अंदाज 10.5 टक्के वर्तवण्यात आला होता. सध्याच्या किमतींवर जीडीपीच्या संभाव्य आकाराचा एनएसओचा अंदाज रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षा जास्त आहे परंतु सरकारच्या अंदाजापेक्षा कमी आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत 7.8 टक्के आणि जुलै-सप्टेंबर तिमाहीत 7.6 टक्के होती.
उत्पादन क्षेत्राची दमदार कामगिरी
चालू आर्थिक वर्षात खाण क्षेत्राची वाढ 8.1 टक्के असू शकते. मागील आर्थिक वर्षात ती 4.6 टक्के होती. उत्पादन क्षेत्राची वाढ 6.5 टक्के राहण्याचा अंदाज असून ती एका वर्षापूर्वीच्या 1.3 टक्क्मयांच्या तुलनेत मोठी सुधारणा मानली जात आहे. बांधकाम क्षेत्राची वाढ 10.7 टक्के राहणार असल्याचा दावा अधिकृत प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे. तसेच कृषी आणि संलग्न क्षेत्रे वगळता, सर्व आर्थिक क्षेत्रांनी 6 टक्क्मयांचा उच्च विकासदर नोंदवला आहे.
Home महत्वाची बातमी भारतीय अर्थव्यवस्था सुसाट
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट
चालू आर्थिक वर्षात 7.3 टक्के दराने विकास शक्य वृत्तसंस्था/ नवी दिल्ली चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशाची अर्थव्यवस्था 7.3 टक्के दराने वाढू शकते, असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) वर्तवला आहे. चालू वर्षात भारताचा जीडीपी 296.58 लाख कोटी रुपये (3,570 अब्ज डॉलर्स) असण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. गेल्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचा विकासदर 7.2 टक्के होता. […]