देश रक्षणासाठी भारतीय सैन्यदल सदैव कटिबद्ध
लोकमान्य सोसायटीतर्फे कारगिल विजयदिन साजरा
बेळगाव : भारतीय सैन्यदल देश रक्षणासाठी सदैव कटिबद्ध आहे. मात्र देशवासियांना युद्धासारख्या बिकटप्रसंगी सैनिकांचे स्मरण होते, हे स्वाभाविक आहे. त्याचा आम्हाला खेद नाही. परंतु जेव्हा एक नागरिक म्हणून लष्कराच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत असे विचारले जाते तेव्हा, तुम्ही असे भारतीय नागरिक व्हा ज्यांचे रक्षण करताना आम्हाला अभिमान वाटेल, अशा भावना मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी व्यक्त केल्या.
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या बेळगावच्या गुरुवारपेठ येथील कार्यालयात कारगिल विजयदिन साजरा केला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी लोकमान्य सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे उपस्थित होते. ब्रिगेडियर व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत या युद्धात वीरमरण पत्करलेल्या भारतीय सैनिकांना मानवंदना दिली. तसेच याच दिवसाचे औचित्य साधून ‘लोकमान्य’तर्फे सैनिक सन्मान योजना सुरू केली.
लष्करासाठी आजचा दिवस महत्त्वाचा
मुखर्जी पुढे म्हणाले, लष्करासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. 25 वर्षांपूर्वी जेव्हा कारगिल युद्ध छेडले, तेव्हा सर्वप्रथम ज्या दोन बटालियननी रिपोर्ट केला, त्यामध्ये एक मराठा लाईट इन्फंट्रीची तुकडी होती. शत्रुशी या ठिकाणाहून सामना करावा लागेल, असा विचारही कोणी केला नव्हता. कोणत्याही युद्धाची किंमत मोजावी लागते. आमचे शेकडो सैनिक धारातीर्थी पडले. त्यांचे स्मरण देशवासियांनी ठेवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी अजित गरगट्टी यांच्या हस्ते जॉयदीप मुखर्जी व अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
Home महत्वाची बातमी देश रक्षणासाठी भारतीय सैन्यदल सदैव कटिबद्ध
देश रक्षणासाठी भारतीय सैन्यदल सदैव कटिबद्ध
लोकमान्य सोसायटीतर्फे कारगिल विजयदिन साजरा बेळगाव : भारतीय सैन्यदल देश रक्षणासाठी सदैव कटिबद्ध आहे. मात्र देशवासियांना युद्धासारख्या बिकटप्रसंगी सैनिकांचे स्मरण होते, हे स्वाभाविक आहे. त्याचा आम्हाला खेद नाही. परंतु जेव्हा एक नागरिक म्हणून लष्कराच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत असे विचारले जाते तेव्हा, तुम्ही असे भारतीय नागरिक व्हा ज्यांचे रक्षण करताना आम्हाला अभिमान वाटेल, अशा भावना मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल […]