विश्व टेटे स्पर्धेत भारताला नऊ पदके

वृत्तसंस्था/ लागोस (नायजेरिया) येथे नुकत्याच झालेल्या विश्व टेबल टेनिस कंटेंडर लागोस स्पर्धेमध्ये भारतीय टेबल टेनिस पथकाने दर्जेदार कामगिरी करताना एकूण 9 पदकांची कमाई केली असून त्यामध्ये 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 5 कांस्यपदकांचा समावेश आहे. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणारी महिला टेबल टेनिसपटू श्रीजा अकुलाने रविवारी या स्पर्धेत महिला एकेरीचे अजिंक्यपद मिळवून […]

विश्व टेटे स्पर्धेत भारताला नऊ पदके

वृत्तसंस्था/ लागोस (नायजेरिया)
येथे नुकत्याच झालेल्या विश्व टेबल टेनिस कंटेंडर लागोस स्पर्धेमध्ये भारतीय टेबल टेनिस पथकाने दर्जेदार कामगिरी करताना एकूण 9 पदकांची कमाई केली असून त्यामध्ये 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 5 कांस्यपदकांचा समावेश आहे.
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणारी महिला टेबल टेनिसपटू श्रीजा अकुलाने रविवारी या स्पर्धेत महिला एकेरीचे अजिंक्यपद मिळवून सुवर्णपदकाला गवसणी घालण्याचा पराक्रम केला आहे. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात श्रीजा अकुलाने चीनच्या डिंग येजीचा 10-12, 11-9, 11-6, 11-8, 11-6 अशा 4-1 गेम्समध्ये पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. महिला एकेरीच्या प्रकारामध्ये भारताच्या अहिका आणि सुतिर्थ कुखर्जी यांनी कांस्यपदक पटकाविले. भारताच्या या दोन्ही खेळाडूंना उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली होती. महिलांच्या दुहेरीमध्ये अकुला आणि अर्चना कामत यांनी अंतिम सामन्यात आपल्याच देशाच्या यशस्वीनी घोरपडे व दिया पराग चितळे यांचा 11-9, 11-6, 12-10 असा पराभव करत रौप्यपदक मिळविले. पुरुष दुहेरीमध्ये भारताचा राष्ट्रीय विजेता हरमीत देसाई आणि मानव ठक्कर यांनी सुवर्णपदक मिळविताना अंतिम सामन्यात नायजेरियाच्या ओमोटेयो व सोलांके यांचा 3-0 असा पराभव केला. भारताने मिश्र दुहेरीत 2 पदके मिळवली. सदर स्पर्धा 19 ते 23 जून दरम्यान नायजेरियात खेळवली गेली.