भारताचा लंकेवर विजय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथे सुरू असलेल्या अंधांच्या समर्थ चॅम्पियनशिप टी-20 क्रिकेट स्पर्धेतील झालेल्या सामन्यात यजमान भारताने लंकेचा 8 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात भारतीय संघातील एम. साई आणि देवराज बेहरा यांनी शानदार अर्धशतके झळकवली.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजी दिली. लंकन संघाने 20 षटकात 7 बाद 142 धावा जमविल्या. त्यानंतर भारताने 2 गडी बाद 143 धावा जमवित हा सामना 40 चेंडू बाकी ठेऊन 8 गड्यांनी जिंकला. भारतीय संघातील एम. साईने 42 चेंडूत 50 तर देवराज बेहराने 29 चेंडूत 54 धावा पटकाविल्या. उभय संघामध्ये सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या या टी-20 मालिकेत भारताने 4-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे.
Home महत्वाची बातमी भारताचा लंकेवर विजय
भारताचा लंकेवर विजय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या अंधांच्या समर्थ चॅम्पियनशिप टी-20 क्रिकेट स्पर्धेतील झालेल्या सामन्यात यजमान भारताने लंकेचा 8 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात भारतीय संघातील एम. साई आणि देवराज बेहरा यांनी शानदार अर्धशतके झळकवली. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजी दिली. लंकन संघाने 20 षटकात 7 बाद 142 धावा जमविल्या. त्यानंतर भारताने […]
