भारत जगात पहिला क्रमांक पटकावेल
जगदीश शेट्टर यांची कुलगोडमध्ये प्रचारसभा
बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश आर्थिकदृष्ट्या सक्षम केला आहे. बलाढ्या अशा जपान-इंग्लंडला मागे टाकून आर्थिक विकास साधला आहे. पंतप्रधानांना आणखी एक संधी दिल्यास भारत जगात पहिल्या क्रमांकाचा देश बनेल, असा विश्वास माजी मंत्री मुरुगेश निराणी यांनी व्यक्त केला. बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या प्रचारार्थ बुधवारी अरभावी मतदारसंघातील कुलगोड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेवेळी निराणी यांनी मतदारांना भाजपलाच मतदान करण्याचे आवाहन केले. देशासाठी 24 तास काम करणारी व्यक्ती नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला मिळाली आहे. मोदी यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधी, महिलांसाठी उज्ज्वला योजना, विमा योजना, जेनेरिक औषधे यासह इतर योजना लागू करून सर्वसामान्यांना त्याचा मोठा लाभ मिळाला.
भालचंद्र जारकीहोळी यांनी काँग्रेसच्या कारभारावर टीका केली. शेट्टर लोकसभेत गेल्यास अरभावी विधानसभा मतदारसंघाला निश्चितच फायदा होईल. अरभावी मतदारसंघाने यापूर्वीही भाजपला सर्वाधिक मताधिक्य दिले आहे. त्यामुळे यावेळीही मोठ्या मताधिक्याने शेट्टर विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महांतेश कवटगीमठ म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या संरक्षणाबाबत कठोर भूमिका घेतल्यामुळेच आज पाकिस्तानच्या कारवाया थंडावल्या आहेत. राममंदिर, 370 कलम हटविणे, तीन तलाक कायदा असे कठोर निर्णय मोदी सरकारने विचारांती घेतले असल्यामुळे सर्वसामान्यांचा मोदी सरकारवर विश्वास असून पुढील सरकार हे भाजपचेच येणार, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी सर्वोत्तम जारकीहोळी, जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, जेडीएसचे अध्यक्ष प्रकाश कडशेट्टी यासह इतर उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी भारत जगात पहिला क्रमांक पटकावेल
भारत जगात पहिला क्रमांक पटकावेल
जगदीश शेट्टर यांची कुलगोडमध्ये प्रचारसभा बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश आर्थिकदृष्ट्या सक्षम केला आहे. बलाढ्या अशा जपान-इंग्लंडला मागे टाकून आर्थिक विकास साधला आहे. पंतप्रधानांना आणखी एक संधी दिल्यास भारत जगात पहिल्या क्रमांकाचा देश बनेल, असा विश्वास माजी मंत्री मुरुगेश निराणी यांनी व्यक्त केला. बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या प्रचारार्थ बुधवारी […]