भारत – बांगलादेश महिला संघात टी-20 मालिका

वृत्तसंस्था/ सिलेत सध्या भारतीय महिला क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर गेला आहे. आता भारत आणि यजमान बांगलादेश महिला क्रिकेट संघामध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेतील सर्व सामने सिलेतच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविले जातील. गेल्या वर्षी भारतीय महिला संघाने बांगलादेशचा दौरा केला होता. या दौऱ्यात उभय संघात झालेली 3 सामन्यांची टी-20 मालिका भारताने 2-1 […]

भारत – बांगलादेश महिला संघात टी-20 मालिका

वृत्तसंस्था/ सिलेत
सध्या भारतीय महिला क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर गेला आहे. आता भारत आणि यजमान बांगलादेश महिला क्रिकेट संघामध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेतील सर्व सामने सिलेतच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविले जातील.
गेल्या वर्षी भारतीय महिला संघाने बांगलादेशचा दौरा केला होता. या दौऱ्यात उभय संघात झालेली 3 सामन्यांची टी-20 मालिका भारताने 2-1 अशा फरकाने जिंकली होती. त्यानंतर उभय संघातील 3 सामन्यांची वनडे मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली होती. ही वनडे मालिका बांगलादेशने बरोबरीत सोडवली असल्याने या मालिकेतून पुन्हा बांगलादेशचा संघ नवी प्रेरणा घेण्यासाठी सज्ज झाला असल्याचे बांगलादेशची कर्णधार निगार सुल्तानाने म्हटले आहे.
मार्च-एप्रिल महिन्यात बांगलादेश महिला संघाला मायदेशामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिका गमवावी लागली होती. या मालिकेनंतर बांगलादेश महिला संघ जोरदार सराव केला असून आता भारता विरुद्धच्या मालिकेत दर्जेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंत भारत आणि बांगलादेश महिला संघामध्ये झालेल्या टी-20 मालिकांमध्ये बांगलादेशला एकही मालिका जिंकता आलेली नाही. भारत आणि बांगलादेश यांच्यातील ही टी-20 मालिका संपल्यानंतर येत्या जुलै महिन्यात लंकेत होणाऱ्या आशिया चषक महिलांच्या टी-20 स्पर्धेत बांगलादेशचा संघा सहभागी होणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात आयसीसीची महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भरविली जाणार आहे.