भारत – दक्षिण आफ्रिका तिसरी निर्णायक ‘वनडे’ आज

भारतीय सलामीवीरांकडून हवी दमदार सुरुवात, ऋतुराज गायकवाड तसेच गोलंदाजीत मुकेश कुमारला लय मिळण्याची गरज प्रतिनिधी/ पार्ल (दक्षिण आफ्रिका) दक्षिण आफ्रिकेविरुद्धची भारताची तिसरी एकदिवसीय लढत आज गुरुवारी होणार असून मालिकेचे जेतेपद ठरविण्याच्या दृष्टीने ही लढत निर्णायक ठरणार आहे. पहिल्या दोन सामन्यांत सलामीची जेडी अपेक्षित सुरुवात करून देऊ शकलेली नसून दक्षिण आफ्रिकेमध्ये दुसऱ्यांदा एकदिवसीय मालिका जिंकण्याच्या भारताच्या […]

भारत – दक्षिण आफ्रिका तिसरी निर्णायक ‘वनडे’ आज

भारतीय सलामीवीरांकडून हवी दमदार सुरुवात, ऋतुराज गायकवाड तसेच गोलंदाजीत मुकेश कुमारला लय मिळण्याची गरज
प्रतिनिधी/ पार्ल (दक्षिण आफ्रिका)
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची भारताची तिसरी एकदिवसीय लढत आज गुरुवारी होणार असून मालिकेचे जेतेपद ठरविण्याच्या दृष्टीने ही लढत निर्णायक ठरणार आहे. पहिल्या दोन सामन्यांत सलामीची जेडी अपेक्षित सुरुवात करून देऊ शकलेली नसून दक्षिण आफ्रिकेमध्ये दुसऱ्यांदा एकदिवसीय मालिका जिंकण्याच्या भारताच्या आशा पल्लवित करायच्या झाल्यास आजच्या सामन्यात सलामीवीरांना दमदार सुऊवत करून द्यावी लागेल.
2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील भारताचा एकमेव एकदिवसीय मालिका विजय नोंदला गेला होता होता आणि त्याची पुनरावृत्ती करायची झाल्यास ऋतुराज गायकवाड आणि बी. साई सुदर्शन यांनी दमदार सुऊवात करून देणे आवश्यक आहे. साई सुदर्शनने मालिकेतील आतापर्यंतच्या दोन खेळींमध्ये 55 आणि 62 धावा करत प्रभावी कामगिरी केली आहे. पण गायकवाड त्याला दुसऱ्या बाजूने साथ देऊ शकलेला नाही. जोहान्सबर्ग आणि पोर्ट एलिझाबेथ येथे भारताची सलामीची जोडी अनुक्रमे 23 आणि 4 धावा जोडल्यानंतर फुटली. गायकवाडला दोन्ही सामन्यांत केवळ 5 आणि 4 धावा काढता आल्या.
याउलट दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर टोनी डी झॉर्झी याने आपले पहिले शतक झळकावलेले आहे आणि रीझा हेंड्रिक्सने लक्ष्याचा पाठलाग करताना 130 धावा काढलेल्या आहेत. भारताच्या तिलक वर्माच्या बाबतीत सुरुवातीला जे आश्वासक चित्र दिसले होते त्याची तीव्रता गेल्या काही महिन्यांत थोडीशी कमी झाल्याचे दिसते. या डावखुऱ्या फलंदाजाला ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या ‘टी-20’ मालिकेत शिखर गाठण्यासाठी संघर्ष करावा लागला आणि ती परिस्थिती दक्षिण आफ्रिकेतही कायम राहिली आहे. त्यामुळे गायकवाड आणि वर्मा यांच्याऐवजी आजच्या सामन्यात रजत पाटीदारला आजमावून पाहण्याची संधी संघ व्यवस्थापनासमोर आहे. कारण भारताकडे सध्या मधल्या फळीत श्रेयस अय्यर नाही.
तथापि, बोलँड पार्कची खेळपट्टी ही सहसा फलंदाजांना अनुकूल असते आणि त्यातून भारताच्या वरच्या फळीला दिलासा मिळू शकतो. पोर्ट एलिझाबेथ खेळपट्टीवर चेंडू विशेषत: पहिल्या डावात, थोडासा जास्त उसळत होता. परंतु पार्ल येथील खेळपट्टीवर अनेकदा चेंडू जास्त उसळत नाही. त्यामुळे फलंदाजांना फटकेबाजी करण्यास संधी मिळू शकते. म्हणूनच मागील सामन्यात 12 धावांवर बाद झालेल्या संजू सॅमसनला ‘फ्री-हिटिंग’च्या दृष्टीने आणखी एक संधी देण्याचा विचार संघ व्यवस्थापन करू शकते.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी भारताला त्यांच्या गोलंदाजी विभागाबाबतही चिंता भेडसावत आहे. मुकेश कुमारला दोन सामन्यांत एकही बळी मिळालेला नाही आणि त्याला लवकरात लवकर सूर गवसणे आवश्यक आहे. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर टोनी डी झॉर्झीने जबरदस्त हल्ला केल्यानंतर बंगालच्या खेळाडूची परिस्थिती कठीण झालेली आहे. अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांनी पहिल्या सामन्यात प्रभावीरीत्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीला गारद केले आणि अर्शदीपने दुसऱ्या सामन्यातही चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे, दक्षिण आफ्रिकेला ‘बॅकफूट’वर ढकलण्यासाठी मुकेशला लय आणि बळी मिळणे अत्यावश्यक आहे.
संघ व्यवस्थापन अनुभवी लेगस्पिनर यजुवेंद्र चहललाही खेळवून पाहण्याचा विचार करू शकते. त्याचा दक्षिण आफ्रिका दौरा आज संपुष्टात येणार आहे. हरयाणतर्फे नुकत्याच झालेल्या विजय हजारे चषक स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केली होती. पण व्यवस्थापन कुलदीप यादव किंवा अक्षर पटेलला चहलसाठी जागा मोकळी करण्याची बाब पटवून देऊ शकेल का हेही पाहावे लागेल. कारण कुलदीप आणि अक्षर या दोघांची कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे आणि या फिरकी जोडीची जास्तीत जास्त सामने खेळण्यास मिळावेत अशी इच्छा असेल.
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेच्या दृष्टिकोनातून डावखुऱ्या डी झॉर्झीच्या कामगिरीने क्विंटन डी कॉकची उणीव भरून काढली जाण्याची आशा निर्माण केली आहे. तसेच वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गर देखील नवीन चेंडवर प्रभावी राहिलेला आहे.
संघ : भारत-के. एल. राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, आकाशदीप.
दक्षिण आफ्रिका-एडन मार्करम (कर्णधार), नांद्रे बर्गर, टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना, विआन मुल्डर, ब्युरन हेंड्रिक्स. रॅसी व्हॅन डर डुसेन, तबरेझ शम्सी, लिझाद विल्यम्स, काइल वेरेन.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 4.30 वा.
 

Go to Source