‘सायबर क्राईम’मध्ये भारत दहाव्या स्थानी

रशिया अव्वल, चीन तिसऱ्या क्रमांकावर वृत्तसंस्था/ लंडन जगभरातील सायबर क्राईम तज्ञांच्या नवीन संशोधनानुसार सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत भारत दहाव्या स्थानावर आहे. तज्ञांनी जाहीर केलेल्या ‘वर्ल्ड सायबर क्राइम इंडेक्स’नुसार फसवणुकीच्या घटनेदरम्यान आगाऊ फी भरण्याशी संबंधित फसवणूक हा सर्वात सामान्य गुन्हा असल्याचे सांगण्यात आले. जगभरात अशा घटना घडत असून त्यात रशिया सर्वात ‘टॉप’वर आहे. तसेच युव्रेन दुसऱ्या आणि […]

‘सायबर क्राईम’मध्ये भारत दहाव्या स्थानी

रशिया अव्वल, चीन तिसऱ्या क्रमांकावर
वृत्तसंस्था/ लंडन
जगभरातील सायबर क्राईम तज्ञांच्या नवीन संशोधनानुसार सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत भारत दहाव्या स्थानावर आहे. तज्ञांनी जाहीर केलेल्या ‘वर्ल्ड सायबर क्राइम इंडेक्स’नुसार फसवणुकीच्या घटनेदरम्यान आगाऊ फी भरण्याशी संबंधित फसवणूक हा सर्वात सामान्य गुन्हा असल्याचे सांगण्यात आले. जगभरात अशा घटना घडत असून त्यात रशिया सर्वात ‘टॉप’वर आहे. तसेच युव्रेन दुसऱ्या आणि चीन तिसऱ्या स्थानावर आहे. अमेरिका चौथ्या स्थानावर असून भारताचे स्थान दहावे आहे.
‘वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स’मध्ये सायबर गुन्ह्यांच्या आधारे गुण देण्यात आले आहेत. मात्र, प्रकरणांची संख्या स्पष्ट करण्यात आलेली नाही. रशियाचा जागतिक सायबर क्राइम इंडेक्स स्कोअर 100 पैकी 58.39, युव्रेनचा 36.44, चीनचा 27.86 तर भारताचा स्कोअर 6.13 इतका असल्याचे दिसून येत आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि न्यू साउथ वेल्स विद्यापीठातील तज्ञांनी सायबर गुन्ह्याचा जागतिक अभ्यास केला. याआधारे निर्देशांक तयार करण्यात आला. हा अभ्यास पाच मुख्य सायबर गुन्ह्यांवर केंद्रित होता.