भारत जर्मनीकडून पराभूत पंचरंगी हॉकी स्पर्धेत सलग तिसरा पराभव
वृत्तसंस्था / व्हॅलेन्सिया, स्पेन
येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या पंचरंगी हॉकी स्पर्धेत भारताची पराभवाची मालिका पुढे चालू राहिली असून मंगळवारी जर्मनीविरुद्ध भारताला 2-3 असा पराभव स्वीकारावा लागला. भारताचा हा सलग तिसरा पराभव आहे.
अभिषेक (नववे मिनिट), शमशेर सिंग (14 वे मिनिट) यांनी भारताचे गोल नोंदवले तर जर्मनीचे गोल माल्ते हेलविग (28 वे मिनिट। ख्रिस्तोफर रुहर (50 वे मिनिट), गोन्झालो पीलट (51 वे मिनिट) यांनी नोंदवले.
भारताने सुरुवात चांगली केली आणि पहिल्या सत्रातच 2-0 अशी आघाडी घेतली. अभिषेक व शमशेर यांनी हे गोल नोंदवले. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी अटीतटीचा खेळ करीत गोलसाठी प्रयत्न केले. हेलविगने त्यात यश आल्याने जर्मनीचा पहिला गोल नोंदवला गेला. मध्यांतराला भारताने 2-1 अशी आघाडी राखली होती. तिसऱ्या सत्रात भारताने भक्कम बचावाचे शानदार प्रदर्शन केले. जर्मनीला दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळाले. पण भारतीय बचावफळीने त्यांना यश मिळू दिले नाही. भारत हा सामना जिंकणार असे वाटत असताना अखेरच्या सत्रात जर्मनीला पेनल्टी स्ट्रोक मिळाला, त्यावर रुहरने अचूक गोल नोंदवत जर्मनीला बरोबरी साधून दिली. त्याच्या पुढच्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर पीलटने जर्मनीचा तिसरा गोल नोंदवला आणि हाच गोल शेवटी निर्णायक ठरला. भारताने अखेरपर्यंत बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न केले. पण त्यात त्यांना यश आले नाही. भारताचा पुढील सामना फ्रान्सविरुद्ध आज बुधवारी होणार आहे.
Home महत्वाची बातमी भारत जर्मनीकडून पराभूत पंचरंगी हॉकी स्पर्धेत सलग तिसरा पराभव
भारत जर्मनीकडून पराभूत पंचरंगी हॉकी स्पर्धेत सलग तिसरा पराभव
वृत्तसंस्था / व्हॅलेन्सिया, स्पेन येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या पंचरंगी हॉकी स्पर्धेत भारताची पराभवाची मालिका पुढे चालू राहिली असून मंगळवारी जर्मनीविरुद्ध भारताला 2-3 असा पराभव स्वीकारावा लागला. भारताचा हा सलग तिसरा पराभव आहे. अभिषेक (नववे मिनिट), शमशेर सिंग (14 वे मिनिट) यांनी भारताचे गोल नोंदवले तर जर्मनीचे गोल माल्ते हेलविग (28 वे मिनिट। ख्रिस्तोफर रुहर (50 […]