अवकाश क्षेत्रात भारत जगात अग्रस्थानी

डॉ. एस. सोमनाथ यांचे प्रतिपादन : गोकाक येथे कायकश्री पुरस्कार वितरण संकेश्वर : इस्रो शास्त्रज्ञांचे चार वर्षांचे अहोरात्र प्रयत्न आणि चांद्रयान-3 च्या यशानंतर भारतीय अवकाश संस्थेतील शास्त्रज्ञांचे मनोधैर्य उंचावलेले आहे. केंद्र सरकारचे पाठबळ व शास्त्रज्ञांच्या मनोधैर्याने भारत अवकाश क्षेत्रात जगात प्रथम क्रमांकावर येईल, असे प्रतिपादन इस्रेचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी केले. गोकाक येथील शून्य […]

अवकाश क्षेत्रात भारत जगात अग्रस्थानी

डॉ. एस. सोमनाथ यांचे प्रतिपादन : गोकाक येथे कायकश्री पुरस्कार वितरण
संकेश्वर : इस्रो शास्त्रज्ञांचे चार वर्षांचे अहोरात्र प्रयत्न आणि चांद्रयान-3 च्या यशानंतर भारतीय अवकाश संस्थेतील शास्त्रज्ञांचे मनोधैर्य उंचावलेले आहे. केंद्र सरकारचे पाठबळ व शास्त्रज्ञांच्या मनोधैर्याने भारत अवकाश क्षेत्रात जगात प्रथम क्रमांकावर येईल, असे प्रतिपादन इस्रेचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी केले. गोकाक येथील शून्य संपादन मठातर्फे चन्नबसवेश्वर विद्यापीठ आवारात 19 व्या शरण संस्कृती उत्सवानिमित्त आयोजित कायकश्री पुरस्कार वितरण व बसवधर्म संमेलनात ते बोलत होते. डॉ. एस. सोमनाथ पुढे म्हणाले, तीन लाख कि.मी. अंतरावरील चंद्र क्षेत्रात अवकाश यान उतरविण्यात यश आले आहे. आता 116 लाख कि.मी. अंतरावरील सूर्यावर यान सोडण्याची भारताची योजना असून  निश्चितच यशस्वी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मुरघराजेंद्र महास्वामी, मल्लिकार्जुन महास्वामी, जी. एस. पाटील, माजी आमदार ए. बी. पाटील उपस्थित होते.