डोंपिंग चाचण्यांचा प्रतिकूल निकाल भारताची टक्केवारी सर्वांत जास्त

वृत्तसंस्था /नवी दिल्ली दोन हजारांहून अधिक नमुन्यांची चाचणी केलेल्या देशांमध्ये डोप चाचणीचा प्रतिकूल निकाल येण्याच्या बाबतीत भारताने सर्वाधिक टक्केवारी नोंदवली आहे. जागतिक उत्तेजकविरोधी संस्थेने (वाडा) जाहीर केलेल्या 2022 च्या चाचणी आकडेवारीच्या अहवालातून हे स्पष्ट झाले असून त्यात दक्षिण आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने सदर कालावधीत 3865 नमुने (मूत्र आणि रक्ताचे एकत्रित) तपासले. त्यापैकी 125 नमुन्यांचे […]

डोंपिंग चाचण्यांचा प्रतिकूल निकाल भारताची टक्केवारी सर्वांत जास्त

वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दोन हजारांहून अधिक नमुन्यांची चाचणी केलेल्या देशांमध्ये डोप चाचणीचा प्रतिकूल निकाल येण्याच्या बाबतीत भारताने सर्वाधिक टक्केवारी नोंदवली आहे. जागतिक उत्तेजकविरोधी संस्थेने (वाडा) जाहीर केलेल्या 2022 च्या चाचणी आकडेवारीच्या अहवालातून हे स्पष्ट झाले असून त्यात दक्षिण आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने सदर कालावधीत 3865 नमुने (मूत्र आणि रक्ताचे एकत्रित) तपासले. त्यापैकी 125 नमुन्यांचे निकाल प्रतिकूल आले. हे प्रमाण एकंदरित नमुन्यांच्या 3.2 टक्के इतके आहे, असे ‘वाडा’ने बुधवारी उशिरा जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. चाचणी केलेल्या नमुन्यांच्या संख्येच्या बाबतीत भारत या यादीत 11 व्या क्रमांकावर राहिला. परंतु डोपिंग उल्लंघनांची संख्या रशिया (85), अमेरिका (84), इटली (73) आणि फ्रान्स (72) या प्रमुख क्रीडा राष्ट्रांपेक्षा जास्त आहे.