इटलीला हरवून भारत उपांत्य फेरीत

ऑलिम्पिक पात्रता महिला हॉकी स्पर्धा, शंभराव्या सामन्यात उदिताचे दोन गोल वृत्तसंस्था/ रांची उदिता दुहानने आपल्या शंभराव्या माईलस्टोन सामन्यात दोन गोल नोंदवल्याने भारतीय महिला संघाने एफआयएच ऑलिम्पिक पात्रता हॉकी स्पर्धेतील सामन्यात इटलीचा 5-1 अशा गोलफरकाने धुव्वा उडवित उपांत्य फेरी गाठली. उदिता (पहिले व 55 वे मिनिट), दीपिका (41 वे मिनिट), सलिमा टेटे (45 वे मिनिट), नवनीत […]

इटलीला हरवून भारत उपांत्य फेरीत

ऑलिम्पिक पात्रता महिला हॉकी स्पर्धा, शंभराव्या सामन्यात उदिताचे दोन गोल
वृत्तसंस्था/ रांची
उदिता दुहानने आपल्या शंभराव्या माईलस्टोन सामन्यात दोन गोल नोंदवल्याने भारतीय महिला संघाने एफआयएच ऑलिम्पिक पात्रता हॉकी स्पर्धेतील सामन्यात इटलीचा 5-1 अशा गोलफरकाने धुव्वा उडवित उपांत्य फेरी गाठली.
उदिता (पहिले व 55 वे मिनिट), दीपिका (41 वे मिनिट), सलिमा टेटे (45 वे मिनिट), नवनीत कौर (53 वे मिनिट) यांनी भारताचे गोल नोंदवले. इटलीचा एकमेव गोल शेवटच्या मिनिटाला कॅमिला मॅचिनने पेनल्टी कॉर्नरवर नोंदवला. या विजयानंतर गट ब मध्ये तीन सामन्यात दोन विजय मिळवित दुसरे स्थान मिळविले. अमेरिकेने तीनही सामने जिंकत या गटात अग्रस्थान मिळविले. भारताची उपांत्य लढत गट अ मध्ये अग्रस्थान मिळविणाऱ्या जर्मनीविरुद्ध आज गुरुवारी होईल. दुसरी उपांत्य लढत याच दिवशी जपान व अमेरिका यांच्यात होणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवून देणारी ही स्पर्धा असून अव्वल तीन संघांना ऑलिम्पिकचे तिकीट मिळणार आहे.
भारतीय महिलांना पहिल्या सामन्यात अमेरिकेकडून 1-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. पण त्यानंतर दुसऱ्या सामन्यात शानदार प्रदर्शन करीत न्यूझीलंडचा पराभव केला आणि तिसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा चमकदार प्रदर्शन करीत विजय साकार केला.