भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज जेतेपदाची झुंज
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वचपा काढण्याची भारताला संधी
बेनोनी (दक्षिण आफ्रिका)
आयसीसी 19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आज रविवारी होणार असलेल्या अंतिम सामन्यात भारताची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे. या स्पर्धेतून काहींची कारकीर्द मोठी झेप घेईल, तर काही जण विस्मृतीत जातील. पण आज 18 आणि 19 वर्षांचे सर्व भारतीय युवा खेळाडू विक्रमी सहाव्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या प्रयत्नात कोणतीही कसर सोडणार नाहीत हे निश्चित आहे.
गेल्या वर्षी 19 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियन संघाने रोहित शर्माच्या शर्माला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभूत करून त्यांचे स्वप्न भंग केले. अशा परिस्थितीत उदय सहारन, सचिन धस, मुशिर खान आणि सौमी पांडे यांच्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाला हरवणे नक्कीच जास्त सुखद ठरेल. ‘आम्ही सुडाचा विचार करत नाही आहोत. आम्ही वर्तमानावर ठामपणे लक्ष केंद्रीत केले आहे आणि आम्हाला भूतकाळात राहायचे नाही तसेच खूप पुढचेही पाहायचे नाही, असे कर्णधार सहारनने अलीकडेच सांगितले आहे.
ऑस्ट्रेलियाकडील एक चौकडी भारतासाठी त्रासदायक ठरू शकते आणि ती म्हणजे कर्णधार ह्यू वेबगेन, सलामीवीर हॅरी डिक्सन, वेगवान गोलंदाज टॉम स्ट्रेकर आणि कॅलम विडलर. या स्पर्धेत त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. भारताने 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत 2012 आणि 2018 च्या अंतिम सामन्यांत ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते आणि याखेपेला विजेतेपद मिळविण्याच्या बाबतीतही त्यांचे पारडे जड मानले जात आहे.
खरे सांगायचे तर, सहारनच्या नेतृत्वाखालील सध्याचा संघ सुऊवातीला फारसा चांगला दिसला नाही. काही महिन्यांपूर्वी झालेल्या 19 वर्षांखालील आशिया कपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यातही तो अपयशी ठरला होता. परंतु येथे सर्व काही जुळून आले आहे. 389 धावांसह फलंदाजीत आघाडीवर असलेल्या सहारनच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी प्रत्येक सामन्यात चांगली होत गेली आहे आणि उपांत्य फेरीत यजमान दक्षिण आफ्रिकेला त्यांनी एका गड्याने हरवले.
यापैकी किती जण खरोखरच मोठी झेप घेतील हे कळत नसले, तरी दोन खेळाडू उठून दिसलेले आहेत. त्यापैकी एक आहे महाराष्ट्राचा युवा फलंदाज धस, ज्याने फिनिशरची भूमिका चांगल्या प्रकारे बजावली आहे. दुसरा आहे डावखुरा फिरकीपटू सौमी पांडे, ज्याने आतापर्यंत 17 बळी घेतले आहेत. धसला ‘आयपीएल’ करार मिळालेला नाही. कारण तो अद्याप कोणताही सामना वरिष्ठ स्तरावर खेळलेला नाही, त्यामुळे तो लिलावासाठी अपात्र ठरला. तथापि, तो एक असा फलंदाज आहे ज्याने सर्वोच्च स्तरासाठी आवश्यक गुण आपल्याकडे असल्याचे दाखवून दिलेले आहे.
सहारन हा डावाची बांधणी करणारा खेळाडू राहिला आहे, तर सर्फराज खानचा धाकटा भाऊ मुशिर हा सर्वाधिक धावा जमविण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असून तो एक डावखुरा फिरकी गोलंदाज देखील आहे. वेगवान गोलंदाज राज लिंबानी आणि डावखुरा वेगवान गोलंदाज नमन तिवारी हेही प्रभावी ठरले आहेत. परंतु पुढील स्तरावर जाण्यास ते अद्याप तयार असल्याचे दिसून आलेले नाही. मात्र आज रविवारी त्यांच्या हातून सर्वोत्तम कामगिरी घडल्यास ते पुरेसे ठरेल.
भारत : उदय सहारन (कर्णधार), सौमीकुमार पांडे (उपकर्णधार), अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंग, ऊद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशिर खान, अरावेली अवनीश राव, मुऊगन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौडा, आराध्य शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी.
ऑस्ट्रेलिया : ह्यू वेबगेन (कर्णधार), लचलान एटकेन, चार्ली अँडरसन, हरकिरत बाजवा, महली बियर्डमन, टॉम कॅम्पबेल, हॅरी डिक्सन, रायन हिक्स, सॅम कोन्स्टास, राफेल मॅकमिलन, एडन ओ’कॉनर, हरजस सिंग, टॉम स्ट्रेकर, कॅलम विडलर, ऑली पीक.
सामन्याची वेळ : दुपारी 1.30 वा.
भारत नवव्यांदा अंतिम फेरीत
भारतीय संघ नेहमीच या स्पर्धेत ‘पॉवरहाऊस’ राहिला आहे. अंतिम सामन्यात पोहोचण्याची ही त्यांची नववी खेप असून त्यावरून गेल्या दोन दशकांत त्यांनी गाजविलेल्या वर्चस्वाची साक्ष येते. 2016 पासून भारताचा 19 वर्षांखालील संघ सर्व विश्वचषक स्पर्धांच्या अंतिम फेरींत खेळलेला आहे. 2018 आणि 2022 च्या स्पर्धा त्यांनी जिंकल्या, तर 2016 आणि 2020 मध्ये ते पराभूत झाले.
2008 पासून वाढले आकर्षण
2008 मध्ये विराट कोहलीच्या संघाने हा चषक जिंकल्यापासून 19 वर्षांखालील विश्वचषकाचे आकर्षण वाढले आहे आणि लाइव्ह टीव्ही कव्हरेज, स्ट्रीमिंगमुळे उत्सुकता जास्तच वाढली आहे. 19 वर्षांखालील विश्वचषकातूनच युवराज सिंग, मोहम्मद कैफ, सुरेश रैना, शिखर धवन, रोहित शर्मा, कोहली, रवींद्र जडेजा, के. एल. राहुल, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वालसारखे तारे उदयास आले
Home महत्वाची बातमी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज जेतेपदाची झुंज
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज जेतेपदाची झुंज
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वचपा काढण्याची भारताला संधी बेनोनी (दक्षिण आफ्रिका) आयसीसी 19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आज रविवारी होणार असलेल्या अंतिम सामन्यात भारताची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे. या स्पर्धेतून काहींची कारकीर्द मोठी झेप घेईल, तर काही जण विस्मृतीत जातील. पण आज 18 आणि 19 वर्षांचे सर्व भारतीय युवा खेळाडू विक्रमी सहाव्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या प्रयत्नात कोणतीही कसर सोडणार […]