देशात इंडिया आघाडी आता राहीली नाही…आंबेडकरांचे राऊत आणि पटोले यांच्यासमोरच विधान

देशात आज इंडिया आघाडी संपली असून मविआचे तसे होऊ देणार नसल्याचं धक्कादायक विधान वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. तसेच काँग्रेस सोबत आमची बोलणी सुरु असून महाविकास आघाडीमध्ये समान किमान कार्यक्रमावर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. विषेश म्हणजे त्यांनी हे विधान संजय़ राऊत आणि नाना पटोले यांच्या समोरच केले आहे. आगामी […]

देशात इंडिया आघाडी आता राहीली नाही…आंबेडकरांचे राऊत आणि पटोले यांच्यासमोरच विधान

देशात आज इंडिया आघाडी संपली असून मविआचे तसे होऊ देणार नसल्याचं धक्कादायक विधान वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. तसेच काँग्रेस सोबत आमची बोलणी सुरु असून महाविकास आघाडीमध्ये समान किमान कार्यक्रमावर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. विषेश म्हणजे त्यांनी हे विधान संजय़ राऊत आणि नाना पटोले यांच्या समोरच केले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या (MahaVikas Aghadi) बैठकीत वंचित बहुजन आघाडीमध्ये महत्वपुर्ण बैठक झाली. या बैठकिला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते नाना पटोले (Nana Patole), संजय राऊत (Sanjay Raut) आणि जयंत पाटील उपस्थित होते. तर वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि रेखा ठाकूर उपस्थित होते.
बैठकीनंतर चारही पक्षाचे प्रतिनिधी माध्यमांसमोर जमले असता प्रकाश आंबेडकरांना पत्रकारांनी बैठकिसंदर्भात विचारले. ते म्हणाले, “महाविकास आघाडीतील जागा वाटपावर पुढील टप्प्यात आम्ही चर्चा करणार आहोत. आज झालेल्या पहिल्या टप्प्यातील चर्चेत आम्ही आम्ही किमान समान कार्यक्रमावर चर्चा केली. त्यातील काही मुद्यांवर आज चर्चा झाली असून उर्वरीत मुद्यांवर लवकरच चर्चा होणार आहे. आघाडीचा समान किमान कार्यक्रम ठरल्यानंतर आम्ही जागा वाटपावर चर्चा करणार आहे.” असेही ते म्हणाले.
बैठकिबाबत धक्कादायक खुलासा करताना ते म्हणाले, “देशातील इंडिया आघाडी आता संपली आहे. इंडिया आघाडीतून नितीश कुमार, आप, ममता बॅनर्जी यांनी वेगवेगळ्या भुमिका घेतल्या आहेत. समाजवादी पक्षाने 16 जागांवर उमेदवार जाहीर केले. मात्र, समाजवादी सोबत राहिल असा विश्वास आहे. या आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये याची काळजी घेणार आहोत.” असेही ते म्हणाले.