IND vs SA 2nd ODI : भारत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून मालिका जिंकण्याचा प्रयत्नात

IND vs SA 2nd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गकुबेरहा येथील सेंट जॉर्ज पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना एकतर्फी जिंकला होता.

IND vs SA 2nd ODI : भारत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून मालिका जिंकण्याचा प्रयत्नात

IND vs SA 2nd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गकुबेरहा येथील सेंट जॉर्ज पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना एकतर्फी जिंकला होता. आता दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर हा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेला मालिकेत बरोबरी साधायची आहे. यापूर्वी टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत होती. अशा स्थितीत एकदिवसीय मालिकेतही दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे. 

 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (19 डिसेंबर) होणार आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गकुबेरहा येथील सेंट जॉर्ज पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4.30 वाजता सुरू होईल. भारतीय संघाने दुसरा सामनाही जिंकल्यास मालिका 2-0 ने जिंकली जाईल. या वनडे मालिकेत केएल राहुल कर्णधारपद सांभाळत आहे.  

 

दोन्ही संघाचे खेळाडू- 

भारत-

केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), रुतुराज गायकवाड़, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, संजू सैमसन (यष्टीरक्षक), वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंह, आकाश दीप।

 

साउथ अफ्रीका-

 एडेन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमैन, नांद्रे बर्गर, टोनी डी जोरजी, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, मिहलाली मपोंगवाना, डेविड मिलर, वियान मुल्डर, एंडिले फेहलुक्वायो, तबरेज शम्सी, रस्सी वैन डर डुसेन, काइल वेरेने, लिजाड विलियम्स

Edited By- Priya DIxit  

 

Go to Source