IND vs AUS Final: ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला, भारताचा सहा गडी राखून पराभव

IND vs AUS Final: ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताचा पराभव केला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (19 नोव्हेंबर) झालेल्या विजेतेपदाचा सामना सहा गडी राखून जिंकून त्याने विजेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता …

IND vs AUS Final: ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला, भारताचा सहा गडी राखून पराभव

IND vs AUS Final:  ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताचा पराभव केला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (19 नोव्हेंबर) झालेल्या विजेतेपदाचा सामना सहा गडी राखून जिंकून त्याने विजेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता ठरला आहे. त्याचवेळी भारताचे तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. या स्पर्धेत सलग 10 सामने जिंकले, मात्र 11व्या सामन्यात संघ मागे पडला. भारताला दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील संघाचा शेवटचा पराभव 2003 मध्ये झाला होता. मार्नस लॅबुशेनने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. ऑस्ट्रेलियाने 40 षटकात 3 बाद 225 धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियान वर्ल्डकप फायनलमध्येे भारताचा सहा विकेट राखून पराभव केला. घरच्या मैदानावर भारताला वर्ल्डकपने पुन्हा एकदा हुलकावणी दिली आणि पॅट कमिन्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने सहावा वर्ल्ड कप जिंकला. वर्ल्डकपच्या सुरुवातीला जखमी असूनही ऑस्ट्रेलियाने संघात ठेवलेल्या ट्रेव्हिस हेडने फायनल आणि सेमी फायनलमध्ये अप्रतिम कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप मिळवून दिला.

 

ट्रेव्हिस हेडने सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धही अर्धशतकी खेळी करून संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती.

 

शमी आणि बुमराने पहिल्या दहा ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट काढल्यानंतर ट्रेव्हिस हेड आणि मार्नस लाबुशेनने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला.

 

ट्रेव्हिस हेडने 120 बॉलमध्ये 137 धावांची खेळी केली तर दुसऱ्या बाजूला मार्नस लाबुशेनने 110 बॉलमध्ये 58 धावांची संयमी खेळी केली.

टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रण दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाने सुरुवातीपासूनच भारतावर दबाव बनवला होता.

 

रोहित शर्माने भारताला आक्रमक सुरुवात तर दिली पण त्यानंतर नियमित अंतराने विकेट पडल्याने भारताचा संघ 240 धावाच करू शकला.

संपूर्ण वर्ल्डकपमध्ये एकदाही ऑल आउट न झालेला, एकही मॅच न हरलेला भारतीय संघ फायनलमध्ये मात्र दबावात आला होता.

 

रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमीसह इतर भारतीय खेळाडूंनाही कांगारूंसमोर लयच सापडली नाही आणि पुन्हा एकदा भारताला आयसीसी स्पर्धेतील विजयाला मुकावं लागलं.

 

पहिल्या डावात पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जॉश हेझलवूड आणि झाम्पाच्या अप्रतिम गोलंदाजीसमोर एकही भारतीय फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. या मैदानावर जबरदस्त रेकॉर्ड असलेल्या शुबमन गिलला 4 धावांवर बाद करत मिचेल स्टार्कनं भारताला पहिला धक्का दिला.

कर्णधार रोहित शर्मानं नेहमीच्या थाटात फलंदाजी करत 31 बॉलमध्ये 47 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडनं मागं पळत जात त्याचा अप्रतिम झेल घेतला. रोहित शर्मा या स्पर्धेत 40 ते 49 दरम्यान पाचव्यांदा बाद झाला.

Edited by – Priya Dixit    

IND vs AUS Final: ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताचा पराभव केला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (19 नोव्हेंबर) झालेल्या विजेतेपदाचा सामना सहा गडी राखून जिंकून त्याने विजेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता …

Go to Source