विमानतळावरून कार्गो वाहतुकीत वाढ

दोन महिन्यात 3 मेट्रिक टन मालाची वाहतूक बेळगाव : बेळगाव विमानतळाच्या विकासाचा आलेख दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. प्रवासी संख्येसोबतच मालवाहतुकीलाही प्राधान्य दिले जात आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांमध्ये 3 मेट्रिक टन मालवाहतूक करण्यात आली असून भविष्यात कार्गो वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे धातू, कागदपत्रे, मौल्यवान वस्तू, भाजीपाला, फुले यांच्या वाहतुकीसाठी एअर कार्गोचा वापर […]

विमानतळावरून कार्गो वाहतुकीत वाढ

दोन महिन्यात 3 मेट्रिक टन मालाची वाहतूक
बेळगाव : बेळगाव विमानतळाच्या विकासाचा आलेख दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. प्रवासी संख्येसोबतच मालवाहतुकीलाही प्राधान्य दिले जात आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांमध्ये 3 मेट्रिक टन मालवाहतूक करण्यात आली असून भविष्यात कार्गो वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे धातू, कागदपत्रे, मौल्यवान वस्तू, भाजीपाला, फुले यांच्या वाहतुकीसाठी एअर कार्गोचा वापर केला जातो. बेळगावमधून दिल्ली विमानफेरी रद्द झाल्यापासून एअर कार्गो पूर्णपणे ठप्प होती. परंतु, 5 ऑक्टोबर 2023 पासून बेळगाव-दिल्ली मार्गावर बोईंग विमान सुरू झाल्याने पुन्हा एकदा एअर कार्गोला सुरुवात झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात 29,285 प्रवाशांनी विमान प्रवास केला होता. तर 1 मेट्रिक टन कार्गो वाहतूक झाली होती. नोव्हेंबर महिन्यात यामध्ये वाढ झाली असून 32,059 प्रवाशांनी विमान प्रवास केला असून 2 मेट्रिक टन मालवाहतूक करण्यात आली आहे. प्रवाशांची संख्या वाढल्यास बेंगळूर, मुंबई या मार्गांवरही कार्गो वाहतूक सुरू होण्याची चिन्हे आहेत.
एअर कार्गो वाहतूक वाढविण्याचा प्रयत्न : त्यागराजन (संचालक, बेळगाव विमानतळ)
बेळगाव-दिल्ली विमानफेरी सुरू झाल्यापासून एअर कार्गो वाहतुकीला प्रारंभ झाला. ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांमध्ये 3 मेट्रिक टन कार्गो वाहतूक करण्यात आली असून डिसेंबरमध्ये ही संख्या वाढली आहे. भविष्यात एअर कार्गो वाहतूक वाढविण्याचा विमानतळ प्राधिकरणाचा प्रयत्न आहे.