सार्वजनिक वाहतुकीकरीता बस मागणीत वाढ

अशोक लेलँड, टाटा मोर्ट्ससह अन्य कंपन्यांच्या बसला सकारात्मक मागणी वृत्तसंस्था /नवी दिल्ली सार्वजनिक वाहतुकीची मागणी आणि बदल यामुळे बसेसच्या 2023च्या मागणीत जोरदार वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. अशोक लेलँडच्या मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहनांच्या बसेसची विक्री गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत या आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत 64 टक्क्यांनी वाढली आहे. या […]

सार्वजनिक वाहतुकीकरीता बस मागणीत वाढ

अशोक लेलँड, टाटा मोर्ट्ससह अन्य कंपन्यांच्या बसला सकारात्मक मागणी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
सार्वजनिक वाहतुकीची मागणी आणि बदल यामुळे बसेसच्या 2023च्या मागणीत जोरदार वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. अशोक लेलँडच्या मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहनांच्या बसेसची विक्री गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत या आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत 64 टक्क्यांनी वाढली आहे. या कालावधीत कंपनीने 11,216 बसेसची विक्री केली. तर, एप्रिल-डिसेंबर दरम्यान, व्होल्वो आयशर कमर्शियल व्हेइकल्सच्या हलक्या आणि मध्यम बसेसच्या विक्रीत 24.7 टक्के आणि अवजड बसेसच्या विक्रीत 36.9 टक्के वाढ झाली आहे. व्हीइसीव्हीने या कालावधीत 9,945 हलक्या आणि मध्यम बसेस आणि 1,369 अवजड बसेसची विक्री केली.
टाटा मोटर्स, ज्यांनी एकट्या बस विक्रीचा अहवाल दिला नाही, कॅलेंडर वर्ष 2023 च्या चारही तिमाहीत त्यांच्या प्रवासी वाहन विक्रीत वाढ झाली आहे. उदाहरणार्थ, टाटा मोटर्सने ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत प्रवासी व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत 19 टक्के वाढ नोंदवली आहे. ती 7704 युनिट्सपर्यंत पोहोचली आहे. जुलै-सप्टेंबर दरम्यान त्यात 32 टक्क्यांनी वाढ झाली असली तरी एप्रिल-जून या कालावधीत 11 टक्के आणि 2023 मध्ये जानेवारी ते मार्च या कालावधीत 70 टक्के वाढ झाली आहे. एकूणच, टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहनांनी वाढ नोंदवली आहे. कंपनीने मंगळवारी सांगितले की त्यांनी आसाम राज्य परिवहन महामंडळाला 100 इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा केला आहे.
टाटा मोटर्सने देशभरातील विविध शहरांमध्ये 1,500 हून अधिक इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा केला आहे. डिसेंबरमध्ये, टाटा मोटर्स लिमिटेडने उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळकडून 1,350 टाटा एलपीओ 1618 डिझेल बसेसचा पुरवठा करण्यासाठी करार केला होता.या बसेस आंतरराज्य आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तयार केल्या आहेत. अशोक लेलँडला डिसेंबरमध्ये तामिळनाडू सरकारकडून 552 अल्ट्रा-लो-एंट्री नॉन-एसी डिझेल बसेसचा पुरवठा करण्याचा आदेश प्राप्त झाला. अशोक लेलँड या बसेसचा पुरवठा यावर्षी एप्रिलपासून सुरू करणार आहे. टाटा मोटर्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ म्हणाले की, जागतिक महामारीनंतर प्रवासी व्यावसायिक वाहनांमध्ये सुधारणा होत आहे. आर्थिक वर्ष 2023 च्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत त्याची विक्री देखील सुमारे 19 टक्क्यांनी वाढली आहे.
मागणीत वाढ कायम राहण्याचे संकेत
आम्हाला आशा आहे की आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीत देखील सरकारचा पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिल्यामुळे मागणीत सुधारणा होत राहील. मागणी कायम आहे आणि भविष्यातही राहील, अशी आशा आहे. सार्वजनिक वाहतुकीची वाढती मागणी आणि जुन्या वाहनांच्या बदलीमुळे एमएचसीव्हीएस बस विभागात चांगली कामगिरी करत राहतील, असे अँटिक स्टॉक ब्रोकिंग विश्लेषकांनी म्हटले आहे.