गांधीनगर हेस्कॉम कार्यालयात पाणी साचल्याने ग्राहकांची गैरसोय
पाणी साचून राहिल्याने चारचाकींनाही प्रवेशबंद
बेळगाव : गांधीनगर येथील हेस्कॉम कार्यालय परिसरात पावसाचे पाणी साचल्याने डबके तयार झाले आहे. त्यामुळे वाहने पार्किंग करणेही अडचणीचे ठरत आहे. कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांना या समस्येचा सामना करावा लागत असल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होईल, अशी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येत आहे. हेस्कॉमचे गांधीनगर येथे उपकार्यालय आहे. या ठिकाणी बेळगाव तालुका ग्रामीण उपविभाग-1 व 2 यांच्या कार्यालयांसोबतच एमआरटी तसेच इतर विभाग आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची या कार्यालयात नेहमी ये-जा सुरू असते. मागील दोन दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे या परिसरात पावसाचे पाणी साचले आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे पाणी साचून आहे. शनिवारी कार्यालयासमोरील खुल्या जागेत पाणी साचल्याने दुचाकीसह चारचाकी वाहने लावणेही अडचणीचे ठरत होते. पावसाच्या पाण्यामुळे केवळ नागरिकांनाच नाहीतर हेस्कॉमचे कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागला. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होईल, अशी व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
Home महत्वाची बातमी गांधीनगर हेस्कॉम कार्यालयात पाणी साचल्याने ग्राहकांची गैरसोय
गांधीनगर हेस्कॉम कार्यालयात पाणी साचल्याने ग्राहकांची गैरसोय
पाणी साचून राहिल्याने चारचाकींनाही प्रवेशबंद बेळगाव : गांधीनगर येथील हेस्कॉम कार्यालय परिसरात पावसाचे पाणी साचल्याने डबके तयार झाले आहे. त्यामुळे वाहने पार्किंग करणेही अडचणीचे ठरत आहे. कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांना या समस्येचा सामना करावा लागत असल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होईल, अशी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येत आहे. हेस्कॉमचे गांधीनगर येथे उपकार्यालय आहे. या ठिकाणी बेळगाव तालुका ग्रामीण उपविभाग-1 व 2 […]