तृतीयपंथीचा महिला घरात एकटीच असल्याचे पाहून लुबाडण्याचा प्रयत्न
सावंतवाडीतील घटना
सावंतवाडी शहरातील एका इमारतीत महिलेच्या सदनिकेत तीन तृतीयपंथी दरवाजा ठोठावून आत शिरले .घरात महिला एकटीच असल्याचा फायदा उठवत पहिल्यांदा पंचवीस हजाराची मागणी केली . महिला तीन तृतीयपंथींना पाहून घाबरली. महिलेने अखेर त्यांच्याशी गयावया करून पाच हजार रुपये गुगल पे करत आपली सुटका करून घेतली. सदर महिलेने शेजारी राहणारे पोलीस प्रविण वालावलकर यांना माहीती देताच वालावलकर यांनी पोलीस स्थानकाची सूत्र हलवली व त्या तीनही तृतीयपंथींना ताब्यात घेतले आहे.तृतीयपंथी हे तृतीयपंथी असल्याचा पेहराव करुन लोकांची फसवणूक करत असल्याचा संशय असून पोलिसांनाही तसा संशय आहे त्या दृष्टीने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी अशी मागणी या इमारतीतील रहिवाशांनी केली आहे. सावंतवाडी शहरातील नागरिकांनी या तृतीयपंथी बाबत सतर्कता पाळावी असे आवाहन करण्यात आले आहे.
Home महत्वाची बातमी तृतीयपंथीचा महिला घरात एकटीच असल्याचे पाहून लुबाडण्याचा प्रयत्न
तृतीयपंथीचा महिला घरात एकटीच असल्याचे पाहून लुबाडण्याचा प्रयत्न
सावंतवाडीतील घटना सावंतवाडी शहरातील एका इमारतीत महिलेच्या सदनिकेत तीन तृतीयपंथी दरवाजा ठोठावून आत शिरले .घरात महिला एकटीच असल्याचा फायदा उठवत पहिल्यांदा पंचवीस हजाराची मागणी केली . महिला तीन तृतीयपंथींना पाहून घाबरली. महिलेने अखेर त्यांच्याशी गयावया करून पाच हजार रुपये गुगल पे करत आपली सुटका करून घेतली. सदर महिलेने शेजारी राहणारे पोलीस प्रविण वालावलकर यांना माहीती […]