गोवावेस येथील मंदिरात उद्घाटन-प्राणप्रतिष्ठापना

बेळगाव : गोवावेस येथील पंचवटी ओमकारेश्वर मंदिराचे उद्घाटन व प्राणप्रतिष्ठापना सोहळा बुधवारी पार पडला. नंदी, शिवपिंडी व कळस यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. पंचवटी देवस्थान मंडळ, पंचवटी रिक्षा स्टँड कमिटी व नागरिकांच्या देणगीतून भव्य मंदिर साकारण्यात आले आहे. मंदिरामध्ये दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. गणेश पंचवटी, मारुती, नागदेवता, महादेव व नवग्रह मंदिर एकाच ठिकाणी आहेत. […]

गोवावेस येथील मंदिरात उद्घाटन-प्राणप्रतिष्ठापना

बेळगाव : गोवावेस येथील पंचवटी ओमकारेश्वर मंदिराचे उद्घाटन व प्राणप्रतिष्ठापना सोहळा बुधवारी पार पडला. नंदी, शिवपिंडी व कळस यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. पंचवटी देवस्थान मंडळ, पंचवटी रिक्षा स्टँड कमिटी व नागरिकांच्या देणगीतून भव्य मंदिर साकारण्यात आले आहे. मंदिरामध्ये दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. गणेश पंचवटी, मारुती, नागदेवता, महादेव व नवग्रह मंदिर एकाच ठिकाणी आहेत. नागरिकांच्या सहकार्यातून पंचवटी ओमकारेश्वर मंदिराचे बांधकाम करण्यात आले. या मंदिराचे उद्घाटन बुधवारी मान्यवरांच्या हस्ते पार पडले. यानिमित्त पहाटे 6 वाजल्यापासून रुद्राभिषेक, होमहवन कार्यक्रम झाले. त्यानंतर प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दोन ते अडीच हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. उद्घाटन सोहळ्यानिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.