आरसीयू जिमखाना विभागाचे उद्घाटन

बेळगाव : येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या जिमखाना विभागाचे उद्घाटन थाटात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरु सी. एम. त्यागराजन होते. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक धुंडीराज व विजेता होसमनी उपस्थित होते. यावेळी विजेता होसमनी यांनी आयएएस परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या परीक्षांना कशाप्रकारे सामोरे गेले पाहिजे, याची सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. यावेळी धुंडीराज यांचे भाषण […]

आरसीयू जिमखाना विभागाचे उद्घाटन

बेळगाव : येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या जिमखाना विभागाचे उद्घाटन थाटात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरु सी. एम. त्यागराजन होते. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक धुंडीराज व विजेता होसमनी उपस्थित होते. यावेळी विजेता होसमनी यांनी आयएएस परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या परीक्षांना कशाप्रकारे सामोरे गेले पाहिजे, याची सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. यावेळी धुंडीराज यांचे भाषण झाले. याप्रसंगी विद्यापीठाच्या राजश्री जैनापुरे यांनी जिमखान्याचे महत्त्व पटवून दिले. कुलगुरु प्रा. सी. एम. त्यागराजन यांनी अध्यक्षीय भाषण केले. डॉ. चंद्रशेखर एस. व्ही., जिमखाना संचालक प्रा. मनीषा नेसरकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मंजुनाथ एन. के. यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी परीक्षा विभाग सचिव प्रा. रविंद्रनाथ कदम, एम. ए. सपना यांच्यासह विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. फर्जाना सिपाई यांनी आभार मानले.