माठेवाड्यात मारुती मंदिराच्या शेड बांधकामाचा शुभारंभ

सावंतवाडी  सावंतवाडी शहरातील माठेवाड्यात अश्वत्थ मारुती मंदिराच्या शेडच्या बांधकामाचा शुभारंभ राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून या शेडच्या पुर्नबांधणीचे बांधकाम होत आहे.माठेवाड्यात कंझुमर्स सोसायटीच्या खत विक्री केंद्रालगत असलेल्या अश्वत्थ मारुती मंदिराच्या शेडचे गेल्या पावसाळ्यात वादळीवाऱ्यामुळे झाड कोसळल्याने नुकसान झाले होते. याबाबत मंत्री दीपक केसरकर यांचे लक्ष […]

माठेवाड्यात मारुती मंदिराच्या शेड बांधकामाचा शुभारंभ

सावंतवाडी 
सावंतवाडी शहरातील माठेवाड्यात अश्वत्थ मारुती मंदिराच्या शेडच्या बांधकामाचा शुभारंभ राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून या शेडच्या पुर्नबांधणीचे बांधकाम होत आहे.माठेवाड्यात कंझुमर्स सोसायटीच्या खत विक्री केंद्रालगत असलेल्या अश्वत्थ मारुती मंदिराच्या शेडचे गेल्या पावसाळ्यात वादळीवाऱ्यामुळे झाड कोसळल्याने नुकसान झाले होते. याबाबत मंत्री दीपक केसरकर यांचे लक्ष वेधताच त्यांनी तात्काळ या शेडच्या पुनर्बांधणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून या शेडच्या पुर्नबांधणीचे बांधकाम होत आहे.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष देव्या सूर्याजी, माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, गजानन नाटेकर, नंदू शिरोडकर, विकास गोवेकर, मंगेश चिटणीस, जितेंद्र सावंत, संजय चिटणीस, बबलू मिशाळ, किशोर चिटणीस, मेहर पडते, अर्चित पोकळे, संदिप निवळे, प्रथमेश प्रभू, साईराज नार्वेकर, महेश बांदेकर, नागेश जगताप, आबा चव्हाण, देवेश पडते आदींसह माठेवाडा येथील रहिवासी उपस्थित होते.

Go to Source