महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने लोकसभा निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार म्हणून महादेव तुकाराम पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खासबाग येथील डबल रोड येथे बुधवारी करण्यात आले. यावेळी सीमाभागातील मराठी जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला असल्याचे दिसून आले. कोणत्याही आमिषांना बळी न पडता स्वयंस्फुर्तीने व उत्स्फूर्तपणे मराठी भाषिक तळमळीने प्रचारकार्यामध्ये सहभागी होत आहेत. विविध भागात काढण्यात आलेल्या पदयात्रेलादेखील मोठ्या संख्येने मतदार सहभागी होत आहेत. विशेषकरून महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याने महादेव पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी शहर म. ए. समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील, तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, नेताजी जाधव, प्रकाश मरगाळे, आर. एम. चौगुले, रमाकांत कोंडुस्कर यांच्यासह म. ए. समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने लोकसभा निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार म्हणून महादेव तुकाराम पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खासबाग येथील डबल रोड येथे बुधवारी करण्यात आले. यावेळी सीमाभागातील मराठी जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला असल्याचे दिसून आले. कोणत्याही आमिषांना बळी न पडता स्वयंस्फुर्तीने व उत्स्फूर्तपणे मराठी भाषिक तळमळीने प्रचारकार्यामध्ये सहभागी होत आहेत. […]
