भटवाडी येथे आयुष्यमान भारत योजनेचा दिपाली भालेकरांच्या हस्ते शुभारंभ

सावंतवाडी । प्रतिनिधी भटवाडी वि. स. खांडेकर विद्यालय सावंतवाडी येथे आयुष्यमान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेचा वार्ड वाईज सावंतवाडी नगरपालिकेच्या माध्यमातून माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.आयुष्मान भारत हा कॅम्प आज दि.२६/१२/२०२३ ते उद्या दि.२७/१२/२०२३ यादिवशी दत्तजयंतीच्या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आला आहे. तरी भटवाडी, बाहेरचावाडा, बोर्जीसवाडा, नागवेकर आवाट, जिमखाना वस्ती इत्यादी प्रभाग क्र.१मधील […]

भटवाडी येथे आयुष्यमान भारत योजनेचा दिपाली भालेकरांच्या हस्ते शुभारंभ

सावंतवाडी । प्रतिनिधी
भटवाडी वि. स. खांडेकर विद्यालय सावंतवाडी येथे आयुष्यमान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेचा वार्ड वाईज सावंतवाडी नगरपालिकेच्या माध्यमातून माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.आयुष्मान भारत हा कॅम्प आज दि.२६/१२/२०२३ ते उद्या दि.२७/१२/२०२३ यादिवशी दत्तजयंतीच्या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आला आहे. तरी भटवाडी, बाहेरचावाडा, बोर्जीसवाडा, नागवेकर आवाट, जिमखाना वस्ती इत्यादी प्रभाग क्र.१मधील नागरिकांनी या कॅम्प मध्ये सहभागी होऊन आपले आपले आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे असे आवाहन मा. नगरसेविका दिपाली भालेकर यांनी केले आहे.हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेविका दिपाली भालेकर,नगरपालिका अधिकारी आसावरी केळबाईकर, वि.स. खांडेकर चे मुख्याध्यापक श्री राजाराम पवार सर,सिस्टर अंकिता म्हापसेकर,नाईक सिस्टर व सुभेदार सिस्टर यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.यावेळी माजी नगरसेविका दिपाली भालेकर,नगरपालिका अधिकारी आसावरी केळबाईकर, वि. स. खांडेकर मुख्याध्यापक राजाराम पवार सर, श्री धुमाळे सर, सौ शृंगारे मॅडम, श्री कोळी सर, श्री परिट सर, सौ घोगळे मॅडम, तसेच शाळा कर्मचारी रणजित लाखे, रवी परब आदी उपस्थित होते.