Solapur : सोलापूरमध्ये केस माघारी घेतो का नाही म्हणत कोयत्याने मारहाण

                          सोलापूरमध्ये कोयत्याने हल्ला; एक जखमी, गुन्हा नोंद सोलापूर : मागील केस माघारी घेतो का नाही असे म्हणून कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास काका महाराष्ट्र चिकन सेंटर, लिमयेवाडी सोलापूर येथे घडली. याप्रकरणी रोहित बसप्पा अण्णारेड्डी (वय […]

Solapur : सोलापूरमध्ये केस माघारी घेतो का नाही म्हणत कोयत्याने मारहाण

                          सोलापूरमध्ये कोयत्याने हल्ला; एक जखमी, गुन्हा नोंद

सोलापूर : मागील केस माघारी घेतो का नाही असे म्हणून कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास काका महाराष्ट्र चिकन सेंटर, लिमयेवाडी सोलापूर येथे घडली.
याप्रकरणी रोहित बसप्पा अण्णारेड्डी (वय २६, रा. मौलाली चौक, कोंची कोरवी गल्ली, हरिजन वस्ती, दुर्गा मंदिर समोर, सोलापूर) यांनी आरोपी सुरेश कृष्णा श्रीराम, प्रदीप गायकवाड, विशाल श्रीराम, प्रज्वल गायकवाड यांच्याविरुद्ध सलगर वरती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास फिर्यादी यांचा वाढदिवस असल्याने फिर्यादीचा भाऊ राहुल अण्णारेड्डी (वय २४) व भाचा रवी संगड हे दोघेजण मिळून लिमयेवाडी येथे असलेल्या काका महाराष्ट्र चिकन सेंटर या ठिकाणी चिकन घेण्यासाठी गेले.
चिकन घेत असताना त्या ठिकाणी आरोपींनी येऊन मागील केस माघार घेतो का नाही असे म्हणून आरोपी प्रदीप गायकवाड याने त्याच्या हातातील कोयता काढला. आता तुला खल्लास करतो असे म्हणून फिर्यादी यांच्या भावाच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले.