Kolhapur : शिवाजी विद्यापीठात टी.ए. बटालियन भरतीला मोठी गर्दी; पहिल्या दिवशी 10 हजार उमेदवार हजर
कोल्हापुरात टी. ए. बटालियनच्या सैन्य भरतीस प्रारंभ
कोल्हापूर : भारतीय सैन्य दलामार्फत टी. ए. बटालियनच्या भरती प्रक्रिया शुक्रवारी (दि. १४) रात्रीपासून शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सुरू झाली. शनिवारी पहिल्याच दिवशी दहा हजार उमेदवारांनी हजेरी लावली आहे. जीवन मुक्ती सेवा संस्थेच्या व्हाईट आर्मनि उमेदवारांसाठी अन्नछत्राची व्यवस्था केली आहे.
टी. ए. बटालियन भरतीसाठी देशभरातून सुमारे ३५ हजार तरुणांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. शुक्रवारी रात्रीपासून शिवाजी विद्यापीठाच्या मैदानात भरती प्रक्रियेला सुरूवात झाली. शनिवारी पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया होती. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, पूणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गटी. ए. बटालियनच्या भरती प्रक्रियेस शुक्रवार पासून प्रारंभ झाला. यासाठी पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील उमेदवारांनी हजेरी लावली होती.
जिल्ह्यांतील सुमारे १० हजार उमेदवारांनी भरतीसाठी गर्दी केली. शनिवारी सकाळपासूनच उमेदवारांनी या परिसरात गर्दी केली होती. रात्री उशिरा कागदपत्रांची तपासणी करून त्यांना मैदानावर प्रवेश देण्यात आला. कडाक्याच्या थंडीतही प्रचंड उत्साहात उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी हजेरी लावली. रात्री उशिरा धावण्याच्या चाचणीने प्रक्रियेला सुरूवात झाली. भरतीदरम्यान अनुचित प्रकार घडू नये, यासाठी राजारामपुरी पोलिसांनी सायबर चौक आणि विद्यापीठ गेल्या १७ वर्षांत पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात झालेल्या सैन्य भरतीदरम्यान सुमारे ६ लाख उमेदवारांना अन्नछत्रामुळे बळ मिळाले. या कामासाठी दानशूरांनी मदत करावी, असे आवाहन रोकडे यांनी केले आहे.परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे. बंदोबस्तासाठी तीन अधिकारी आणि ५० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.
उमेदवारांसाठी व्हाईट आर्मीकडून अन्नछत्र
भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना सलग १२ ते १५ तास मैदानावर थांबावे लागते. एकदा आत गेल्यानंतर प्रक्रिया संपल्याशिवाय त्यांना बाहेर पडता येत नाही. त्यामुळे जीवन मुक्ती संस्थेच्या व्हाईट आर्मीकडून उमेदवारांसाठी अन्नछत्र राबवले जाते. कोल्हापूर आणि त्यानंतर सातारा येथे अन्नछत्राची व्यवस्था केल्याची माहिती व्हाईट आर्मीचे प्रमुख अशोक रोकडे यांनी दिली.
