साताऱ्यात प्रियकराने प्रेयसीशी वाद झाल्यामुळे इमारतीवरून खाली फेकले,तरुणीचा मृत्यू

साताऱ्यात कराड येथे एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला संशयावरून वाद झाल्याने रागात येत इमारतीवरून खाली फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात तरुणीचा मृत्यू झाला. तर तरुण स्वतः जखमी झाला आहे.

साताऱ्यात प्रियकराने प्रेयसीशी वाद झाल्यामुळे इमारतीवरून खाली फेकले,तरुणीचा मृत्यू

साताऱ्यात कराड येथे एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला संशयावरून वाद झाल्याने रागात येत इमारतीवरून खाली फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात तरुणीचा मृत्यू झाला. तर तरुण स्वतः जखमी झाला आहे. त्याला रुग्णालय दाखल करण्यात आले असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरुषी आणि ध्रुव असे या तरुण आणि तरुणीचे नाव आहे. 

सदर घटना कराड मध्ये घडली ध्रुव आणि आरुषी हे दोघे दिल्लीत एकत्र शिकायचे आणि त्यांच्यात मैत्री झाली. नंतर दोघांनी कराडच्या एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षणासाठी प्रवेश घेतला, ध्रुवने आरुषीला भेटायला त्याच्या भाड्याच्या फ्लॅटवर बोलावले. आरुषीचे इतर तरुणाशी प्रेम संबंध असल्याचा संशयावरून त्याने आरुषीला म्हटले यावरून त्यांच्यात भांडण झाले.रागाच्या भरात त्यांच्यात मारामारी झाली. या मध्ये दोघे जखमी झाले.

तरुणाला राग आला आणि त्याने तरुणीला इमारतीवरून खाली ढकलून दिले. तिचा जागीच मृत्यू झाला. ध्रुव मारामारीत जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पोलिसांनी त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 नुसार गुन्हा दाखल केला असून अद्याप त्याला अटक केली नाही. पुढील तपास सुरु आहे.  

 

Edited by – Priya Dixit 

 

Go to Source