सदाशिवनगरात महिलेच्या गळ्यातील दागिना लांबविला

बेळगाव : दुचाकीवरून आलेल्या भामट्याने एका महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेऊन पलायन केल्याची घटना बुधवारी सकाळी सदाशिवनगर शेवटच्या बसस्टॉपजवळ घडली. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. चेनस्नॅचिंगच्या वाढत्या प्रकाराने महिला हैराण झाल्या आहेत. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चेनस्नॅचिंग करण्यासह चाकू हल्ला करून दागिने पळविण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. सदाशिवनगर येथील घटना सीसीटीव्हीत कैद झाली […]

सदाशिवनगरात महिलेच्या गळ्यातील दागिना लांबविला

बेळगाव : दुचाकीवरून आलेल्या भामट्याने एका महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेऊन पलायन केल्याची घटना बुधवारी सकाळी सदाशिवनगर शेवटच्या बसस्टॉपजवळ घडली. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. चेनस्नॅचिंगच्या वाढत्या प्रकाराने महिला हैराण झाल्या आहेत. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चेनस्नॅचिंग करण्यासह चाकू हल्ला करून दागिने पळविण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. सदाशिवनगर येथील घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून दुचाकीवरून आलेल्या भामट्याने महिलेच्या गळ्यातील तोळ्याचा दागिना पळविला आहे. लक्ष्मी कल्लाप्पा किळीकेतक (वय 45) या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल केला आहे. घटनेची माहिती समजताच एपीएमसीचे पोलीस निरीक्षक खाजा हुसेन व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हेगाराच्या शोधासाठी परिसरात नाकेबंदी करून तपासणी करण्यात आली. मात्र, बुधवारी रात्रीपर्यंत पोलिसांना यश आले नाही. निळ्या व पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या भामट्याने हे कृत्य केले असून दोन्ही हातात पिशव्या घेऊन कामावर निघालेल्या महिलेच्या गळ्यातील दागिना पळविण्यात आला आहे. एपीएमसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.