Pandharpur Crime : पंढरपूरात चक्क भर मांडवातूनच वधूचे दागिने लंपास
पंढरपूरमध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमात चोरीची घटना
पंढरपूर : विवाह सोहळ्याच्या ठिकाणी सर्वजण हळदी आणि साखरपुड्याच्या कार्यक्रमात गुंतल्याची संधी साधत चोरट्याने नववधूचे खोलीत ठेवलेले तीन लाखांचे दागिने लंपास केले. ही घटना पंढरपुरातील एका कार्यालयामध्ये घडली.
विशाल विठ्ठल भूसनर (वय ४०, रा. व्होळे, सध्या रा. कांदिवली वेस्ट, मुंबई) यांनी शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी फिर्याद दाखल केली आहे.विशाल यांची बहिण नमिता यांचा विवाह होता. तत्पूर्वी, वधू-वरांसह शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
दोन्हीकडील नातेवाईक हळदी आणि साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी विवाहस्थळी दाखल झाले होते. या दरम्यान, आई रुक्मिणी यांनी नमिता यांना ३ लाखांचा ३ तोळे सोन्याचा नेकलेस, ५ हजाररांचे ५० ग्रॅम चांदीचे पैंजण आणि २ हजारांचे २० ग्रॅम चांदीचे जोडवे असे ३ लाख ७ हजार रुपये किमतीचे दागिने दिले होते.
दागिने एका कॅरिबॅगमध्ये ठेऊन विशाल भूसनर यांची पुतणी शुभांगी हिच्याजवळ ठेवण्यासाठी दिले होते. त्यानुसार तिने दागिने वधू पक्षाच्या खोलीत बेडवर ठेवले. त्यानंतर सर्वजण हळदी आणि साखरपुड्याच्या कार्यक्रमात व्यस्त झाले. नेमकी ही संधी साधत चोरट्याने सर्व दागिने लंपास केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सहायक उपनिरीक्षक राजेश गोसावी तपास करीत आहेत.
