मजगावात शाळा आवारातील झाडाची फांदी तुटल्याने तीन दुचाकींचे नुकसान
मजगाव : मजगाव येथील कन्नड प्राथमिक शाळेच्या आवारातील जुनाट वृक्षाची फांदी वाऱ्याने गुरूवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर रस्त्याकडेला कोसळली. मात्र सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. पण रस्त्याच्या बाजूला लावलेल्या तीन दुचाकींचे किरकोळ नुकसान झाले. कन्नड प्राथमिक शाळेची पटसंख्या सुमारे 350 आहे. सायंकाळी नुकतीच शाळा सुटली होती. त्यानंतर शाळेच्या प्रवेशद्वाराच्या बाजूच्या एका झाडाची फांदी एकदम तुटून रस्त्यावर कोसळली. मात्र त्यावेळी सर्व मुले पुढे गेल्याने पुढील अनर्थ टळला. असे यावेळी प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. येथील नागरिक जयपाल बस्तवाड, बी. डी. कुडची व शांतीनाथ मण्णूर यांनी रस्त्यावरील फांदी बाजूला काढण्यास सहकार्य केले. वरील प्रकारामुळे पालकवर्गाने चिंता व्यक्त केली असून, जुन्या झाडांच्या फांद्या कमी कराव्यात अशी मागणी यावेळी केली.
Home महत्वाची बातमी मजगावात शाळा आवारातील झाडाची फांदी तुटल्याने तीन दुचाकींचे नुकसान
मजगावात शाळा आवारातील झाडाची फांदी तुटल्याने तीन दुचाकींचे नुकसान
मजगाव : मजगाव येथील कन्नड प्राथमिक शाळेच्या आवारातील जुनाट वृक्षाची फांदी वाऱ्याने गुरूवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर रस्त्याकडेला कोसळली. मात्र सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. पण रस्त्याच्या बाजूला लावलेल्या तीन दुचाकींचे किरकोळ नुकसान झाले. कन्नड प्राथमिक शाळेची पटसंख्या सुमारे 350 आहे. सायंकाळी नुकतीच शाळा सुटली होती. त्यानंतर शाळेच्या प्रवेशद्वाराच्या बाजूच्या एका झाडाची फांदी एकदम तुटून रस्त्यावर […]
