Kolhapur : कोल्हापुरात सैन्य भरतीतील तरुणांचा थंडीतच मैदानावरच मुक्काम
थंडीतही भरतीसाठी तरुणांची धडपड; मैदानातच काढली रात्र
कोल्हापूर : भारतीय सैन्य दलाच्या दि. ए. बटालियन प्रादेशिक सैन्य भरती आलेल्या तरुणांनी कालचा दिवसही थंडीतच मैदानातच घालवावा लागला, गरीबीची चटके सहन करणाऱ्या तरुणांनी पैसे अभावी जवळच असणाऱ्या फूटपाथ व मैदानावरच राहणे पसंद केले. राधाबाई शिंद पटांगणावर अनेकांनी बळकटी टाकून मुक्काम केला. दरम्यान, काल सुमारे सात ते आठ हजार तरूण भरती परीक्षेला सामोरे केले.तासन तास सराव करणाऱ्या या जवानांच्या भरतीच्या परीक्षेचा कालचा दिवसही महत्वपूर्ण ठरला.
धावताना आपणच भरती होणार, असा आत्मविश्वास घेत अनेकांनी दिवसभरातील भरती परीक्षेत उत्साही सहभाग दाखवला. शिवाजी विद्यापीठ येथील मैदानात सात ते आठ हजार जवानांनी भरतीची परीक्षा दिली. सर्वसाधारण व ट्रेडमनसाठी ही भरती सुरु आहे. आणखी पंधरा दिवस विद्यापीठातील मैदानात ही भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे. दहावी व बारावी पास अशी भरतीचीअट आहे. १८ ते ४२ या वयोगटासाठी ही भरती सुरु आहे. धावणे, उंची, वजन, छाती आदीबाबतची काल परीक्षा झाली.
भरतीसाठी दाखल झालेल्या कोल्हापूर, सांगली. सातारा, सोलापूर, तेलंगणा आदी परिसरातील मुलांनी भरतीसाठी हजेरी दाखवली. जीवन मुक्ती सेवा संस्थेच्या व्हाईट आर्मीच्यावतीने जेवणाची सोय करण्यात आली होती.
हरिनाम यात्री निवासीमध्ये केली अल्पदरात सोय
देशसेवेची जिद्द बाळगत सैन्य भरतीसाठी आलेल्या तरुणांच्या राहण्याची आणि जेवणाची अल्पदरात सोय करण्यात आली आहे. स्टेशनरोड, गोकुळ हॉटेलसमोर हरिनाम यात्रीनिवासमध्ये गौरव लांडगे यांनी ८० जणांची सध्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था अत्यंत अल्पदरात केली आहे.
या मुलांच्यासाठी कायमची राहण्याची सोय करावी
देशसेवेसाठी येणाऱ्या तरुणांची प्रशासनाकडून हेळसांड होत आहे. कहाक्याच्या थंडीत या जवानांचा आघातही होऊ शकती, थंडीत गोदून मोठा आघात होण्याची दाट शक्यत असते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून या तरुणांच्यासाठी कायमची राहण्याची जेवणाची सोय करावी –फिरोज शेख (सामाजिक कार्यकर्त )
पोलीस बंदोबस्तात भरती
देशासाठी सेवा करण्यास उत्सुक असलेल्या जवानांच्यासाठी पोलीस दलाच्यावतीने बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ३ अधिकाऱ्यांच्यासह पन्नास कर्मचारी यासाठी नेमले आहेत. सायबर चौकासह विद्यापीठ परिसरात पोलीसांचा चौख बंदोबस्त सुरू आहे.
