खानापूर शहर परिसरात शिवजयंती उत्साहात

खानापूर : शहरात शुक्रवारी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळातर्फे 98 वी शिवजयंती ज्ञानेश्वरी मंदिरात उत्साहात साजरी केली. दुपारी 12 वाजता शिवजन्म सोहळा, सायंकाळी 6 वाजता पालखी मिरवणूक काढली. शिवस्मारक येथे शहरातील मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाची पालखी आणि दांडपट्टा पथक गुरव गल्ली, रवळनाथ युवक मंडळाचा चित्ररथ, चव्हाटा युवक मंडळाचे चित्ररथ आणि दांडपट्टा पथक तसेच महालक्ष्मी मंडळाचे चित्ररथ […]

खानापूर शहर परिसरात शिवजयंती उत्साहात

खानापूर : शहरात शुक्रवारी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळातर्फे 98 वी शिवजयंती ज्ञानेश्वरी मंदिरात उत्साहात साजरी केली. दुपारी 12 वाजता शिवजन्म सोहळा, सायंकाळी 6 वाजता पालखी मिरवणूक काढली. शिवस्मारक येथे शहरातील मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाची पालखी आणि दांडपट्टा पथक गुरव गल्ली, रवळनाथ युवक मंडळाचा चित्ररथ, चव्हाटा युवक मंडळाचे चित्ररथ आणि दांडपट्टा पथक तसेच महालक्ष्मी मंडळाचे चित्ररथ यांचे आगमन सायंकाळी 7 वाजता झाले. या ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते पालखी व शिवपुतळ्याचे पूजन झाल्यानंतर मिरवणुकीला सुरवात झाली. मध्यवर्ती शिवजयंती पालखी स्टेशनरोड, चिरमुरकर गल्ली, ज्ञानेश्वर मंदिर, केंचापूर गल्ली, बाजारपेठ, घाडी गल्ली, देसाई गल्ली, विठोबा देव गल्ली येथून घोडे गल्लीतून मंदिरात सांगता झाली. चित्ररथ मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. चित्ररथावरील देखावे पाहण्यासाठी स्टेशनरोड, महालक्ष्मी मंदिर, महाजनखुट्ट, बेंद्रे खुट्ट, केंचापूर गल्ली, गुरव गल्ली, संभाजी चौक या ठिकाणी महिला, पुरुष व युवकांनी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत चित्ररथ मिरवणूक सुरु होती.