चिटणीस स्कूलच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात

बेळगाव : टिळकवाडी येथील जी. जी. चिटणीस स्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धार्थ मरवे, फुटबॉल संघटनेचे सचिव अमित पाटील, संस्थेचे अध्यक्ष अॅड. चंद्रहास अणवेकर, खजिनदार एस. एन. देसाई, इंद्रनील अणवेकर, मुख्याध्यापिका डॉ. नवीना शेट्टीगार आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेतील विविध गटातील खेळाडूंनी […]

चिटणीस स्कूलच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात

बेळगाव : टिळकवाडी येथील जी. जी. चिटणीस स्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धार्थ मरवे, फुटबॉल संघटनेचे सचिव अमित पाटील, संस्थेचे अध्यक्ष अॅड. चंद्रहास अणवेकर, खजिनदार एस. एन. देसाई, इंद्रनील अणवेकर, मुख्याध्यापिका डॉ. नवीना शेट्टीगार आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेतील विविध गटातील खेळाडूंनी पथसंचलन करून मानवंदना दिली. राज्यस्तरीय क्रीडापटू आदित्य जोशीलकर व समर्थ भातकांडे यांनी क्रीडाज्योत मैदानाभोवती फिरवून पाहुण्यांकडे सुपूर्द केली. विनोद भातकांडे यांनी सर्व क्रीडापटूंना शपथ दिली. या क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत मजल मारलेल्या क्रीडापटूंचा खास सत्कार करण्यात आला. शांतीचे प्रतिक म्हणून रंगीबेरंगी फुगे हवेत सोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी कवायतीचे विविध प्रकार सादर केले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक जयसिंग धनाजी व इतर शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.