लंडन आयच्या धर्तीवर पालिका Mumbai Eye उभारणार

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मंगळवारी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी बीएमसीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा 74,427 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प  मागील वर्षाच्या तुलनेत 14.19% जास्त आहे. बीएमसीने युनायटेड किंग्डमच्या प्रतिष्ठित लंडन आयच्या अनुषंगाने मुंबई आय विकसित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. महानगरपालिकेने दशकापूर्वी रखडलेल्या या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन केले. त्यासाठी दोन ते तीन एकर जागेची आवश्यकता असेल.पर्यटकांना लंडन शहराचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी बनवण्यात आलेल्या प्रसिद्ध लंडन आयच्या धर्तीवर ‘मुंबई आय’ उभारण्यात येणार आहे. यामुळे उंचावरुन मुंबई शहर न्याहाळण्याची सुविधा पर्यटकांना उपलब्ध होणार आहे.  मुंबई पर्यटनवाढीसाठी महापालिकेच्या नव्या योजनांमध्ये या ‘मुंबई आय’चा समावेश आहे. मात्र ज्या ‘लंडन आय’च्या धर्तीवर मुंबईमध्ये ‘मुंबई आय’ उभारण्यात येणार आहे. यामुळे हे स्थळ मुंबईत येणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरणार आहे.  लंडन शहरात थेम्स नदीच्या किनारी असलेला अजस्त्र पाळणा आहे. सुमारे 800 फूट उंचीवरून लंडन शहराचे दर्शन होते. युनायटेड किंग्डममधील हे सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी 35 लाख पर्यटक लंडन आय’ भेट देतात ‘लंडन आय’मधून संपूर्ण लंडन शहर एका नजरेत पाहू शकतो त्यामुळे लंडननंतर आता मुंबईतही सीलिंकच्या जवळ असलेल्या कास्टिंग यार्डच्या ठिकाणी वरळीहून बांद्र्याला जात असताना समुद्राच्या किनारी हे ‘मुंबई आय’ उभारण्यात येणार आहे.  ‘मुंबई आय’ साकारण्यात आल्यास पर्यटकांचा ओढा मुंबईकडे वाढणार आहे. या ‘मुंबई आय’मधून संपूर्ण मुंबईचे विहंगमय दृष्य पाहण्याची संधी पर्यटक आणि मुंबईकरांना उपलब्ध होणारयहेही वाचा महाराष्ट्रातील स्कूल बस मालकांची 18% शुल्कवाढीची मागणीहवा गुणवत्ता देखरेखीसाठी 5 नवीन वायू गुणवत्ता देखरेख केंद्रे

लंडन आयच्या धर्तीवर पालिका Mumbai Eye उभारणार

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मंगळवारी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी बीएमसीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा 74,427 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प  मागील वर्षाच्या तुलनेत 14.19% जास्त आहे. बीएमसीने युनायटेड किंग्डमच्या प्रतिष्ठित लंडन आयच्या अनुषंगाने मुंबई आय विकसित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. महानगरपालिकेने दशकापूर्वी रखडलेल्या या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन केले. त्यासाठी दोन ते तीन एकर जागेची आवश्यकता असेल.
पर्यटकांना लंडन शहराचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी बनवण्यात आलेल्या प्रसिद्ध लंडन आयच्या धर्तीवर ‘मुंबई आय’ उभारण्यात येणार आहे. यामुळे उंचावरुन मुंबई शहर न्याहाळण्याची सुविधा पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. मुंबई पर्यटनवाढीसाठी महापालिकेच्या नव्या योजनांमध्ये या ‘मुंबई आय’चा समावेश आहे. मात्र ज्या ‘लंडन आय’च्या धर्तीवर मुंबईमध्ये ‘मुंबई आय’ उभारण्यात येणार आहे. यामुळे हे स्थळ मुंबईत येणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरणार आहे. लंडन शहरात थेम्स नदीच्या किनारी असलेला अजस्त्र पाळणा आहे. सुमारे 800 फूट उंचीवरून लंडन शहराचे दर्शन होते. युनायटेड किंग्डममधील हे सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी 35 लाख पर्यटक लंडन आय’ भेट देतात’लंडन आय’मधून संपूर्ण लंडन शहर एका नजरेत पाहू शकतो त्यामुळे लंडननंतर आता मुंबईतही सीलिंकच्या जवळ असलेल्या कास्टिंग यार्डच्या ठिकाणी वरळीहून बांद्र्याला जात असताना समुद्राच्या किनारी हे ‘मुंबई आय’ उभारण्यात येणार आहे. ‘मुंबई आय’ साकारण्यात आल्यास पर्यटकांचा ओढा मुंबईकडे वाढणार आहे. या ‘मुंबई आय’मधून संपूर्ण मुंबईचे विहंगमय दृष्य पाहण्याची संधी पर्यटक आणि मुंबईकरांना उपलब्ध होणारयहेही वाचामहाराष्ट्रातील स्कूल बस मालकांची 18% शुल्कवाढीची मागणी
हवा गुणवत्ता देखरेखीसाठी 5 नवीन वायू गुणवत्ता देखरेख केंद्रे

Go to Source