अक्षर, यशस्वी यांची मानांकनात सुधारणा

दुबई : आयसीसीच्या पुरूषांच्या टी-20 फलंदाजांच्या ताज्या मानांकनात अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल या भारतीय खेळाडूंची सुधारणा झाली आहे. नुकत्याच झालेल्या भारत आणि अफगाण यांच्यातील बुधवारच्या शेवटच्या टी-20 सामन्यात अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल यांची कामगिरी दर्जेदार झाल्याने त्यांच्या मानांकनात सुधारणा झाली आहे. भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल आता मानांकनात पाचव्या स्थानावर असून यशस्वी […]

अक्षर, यशस्वी यांची मानांकनात सुधारणा

दुबई : आयसीसीच्या पुरूषांच्या टी-20 फलंदाजांच्या ताज्या मानांकनात अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल या भारतीय खेळाडूंची सुधारणा झाली आहे. नुकत्याच झालेल्या भारत आणि अफगाण यांच्यातील बुधवारच्या शेवटच्या टी-20 सामन्यात अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल यांची कामगिरी दर्जेदार झाल्याने त्यांच्या मानांकनात सुधारणा झाली आहे. भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल आता मानांकनात पाचव्या स्थानावर असून यशस्वी जैस्वाल सहाव्या स्थानावर आहे. अफगाण विरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत अक्षर पटेलने पहिल्या दोन सामन्यांमध्ये 4 गडी बाद केले होते. तीन सामन्यांच्या या मालिकेत टी-20 प्रकाराच्या अष्टपैलूंच्या मानांकनात अक्षर पटेलचे स्थान वधारले असून तो आता पाचव्या स्थानावर आहे.