पाळणा घर योजनेची अंमलबजावणी सुरू

रोहयो महिलांच्या बालक संगोपनाचा प्रश्न मार्गी : काकतीत सुरुवात बेळगाव : रोजगार हमी योजनेतील महिला कामगारांच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी पाळणा घर योजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सोमवारी काकती ग्राम पंचायत क्षेत्रात पहिल्या पाळणा घराची सुरुवात झाली आहे. त्यामुळे रोजगार हमी कामावर जाणाऱ्या महिलांच्या बालकांच्या संगोपनाचा प्रश्न मार्गी लागला […]

पाळणा घर योजनेची अंमलबजावणी सुरू

रोहयो महिलांच्या बालक संगोपनाचा प्रश्न मार्गी : काकतीत सुरुवात
बेळगाव : रोजगार हमी योजनेतील महिला कामगारांच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी पाळणा घर योजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सोमवारी काकती ग्राम पंचायत क्षेत्रात पहिल्या पाळणा घराची सुरुवात झाली आहे. त्यामुळे रोजगार हमी कामावर जाणाऱ्या महिलांच्या बालकांच्या संगोपनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. रोहयो कामगारांच्या तीन वर्षांखालील मुलांचे संगोपन व्हावे, यासाठी सरकारने पाळणा घरांची संकल्पना अंमलात आणली आहे. जिल्ह्यात 270 हून अधिक ग्राम पंचायतींमध्ये पाळणा घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यापैकी बेळगाव तालुक्यात 41 पाळणा घरे सुरू होणार आहेत. त्यातील पहिल्या पाळणा घराची सुरुवात काकती ग्राम पंचायतमध्ये झाली. याचबरोबर इतर ग्राम पंचायतींमध्येही पाळणा घरे सुरू होणार आहेत. त्यामुळे बालकांचा किलबिलाट पाळणा घरात दिसणार आहे.
पाळणा घरांमध्ये साधनसामग्री आणि मनोरंजनात्मक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे पाळणा घरात रोहयो कामगारांची मुले रमणार आहेत. बेळगाव तालुक्यात 41 ग्राम पंचायतींमध्ये पाळणा घरे सुरू होणार आहेत. याची सुरुवात काकती ग्राम पंचायतीमधून झाली आहे. तीन वर्षांखालील मुले असलेल्या रोहयो महिला कामगारांना कामाला जाता यावे, यासाठी ही पाळणे घरे सुरू केली आहेत. सकाळी 9 ते दुपारी 3.30 यावेळेत पाळणा घरे भरणार आहेत. यावेळेत महिला कामगारांना आपल्या बालकांना या घरात सोडून जाता येणार आहे. त्यामुळे रोहयो कामगारांच्या संख्येत वाढ होणार आहे. शिवाय लहान मुले असणाऱ्या कामगारांनाही रोहयोचा अधिक फायदा घेता येणार आहे.