दर्जेदार औषधे-आरोग्य हक्क कायदा लागू करा

विविध संघटनांचे संयुक्तपणे मुख्यमंत्र्यांना निवेदन, औषधे सरकारी रुग्णालयांतून मोफत उपलब्ध करून द्यावीत बेळगाव : सरकारी रुग्णालयांतून मोफत व दर्जेदार औषधे उपलब्ध करून द्यावीत. राज्यात आरोग्य हक्क कायदा लागू करण्यात यावा, अशा काही मागण्या विविध संघटनांनी केल्या आहेत. संघटनांच्या सदस्यांनी मंगळवारी (दि. 3) एकत्र येऊन  मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. सरकारी रुग्णालयातील […]

दर्जेदार औषधे-आरोग्य हक्क कायदा लागू करा

विविध संघटनांचे संयुक्तपणे मुख्यमंत्र्यांना निवेदन, औषधे सरकारी रुग्णालयांतून मोफत उपलब्ध करून द्यावीत
बेळगाव : सरकारी रुग्णालयांतून मोफत व दर्जेदार औषधे उपलब्ध करून द्यावीत. राज्यात आरोग्य हक्क कायदा लागू करण्यात यावा, अशा काही मागण्या विविध संघटनांनी केल्या आहेत. संघटनांच्या सदस्यांनी मंगळवारी (दि. 3) एकत्र येऊन  मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. सरकारी रुग्णालयातील डॉक्टर अनेकदा रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगतात. यामुळे रुग्णांना आर्थिक फटका बसतो. सर्व प्रकारची औषधे सरकारी रुग्णालयांतून मोफत उपलब्ध करून द्यावीत तसेच औषधे उत्तम दर्जेदार असावीत. तामिळनाडूच्या धर्तीवर कर्नाटकातही राज्य वैद्यकीय पुरवठा निगमची स्थापना 2013 मध्ये झाली आहे. पण, निगमचे काम व्यवस्थित सुरू नसल्याने आजही सरकारी रुग्णालयांतून औषधांचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. खासगी रुग्णालये मनमानीपणे बिल घेऊन रुग्णांचे शोषण करीत असतात. खासगी रुग्णालयांना शुल्क निर्धारित करून द्यावी. सरकारी रुग्णालयांचे खासगीकरण करण्याचे धोरण सरकारने मागे घ्यावे. समाजातील सर्व घटकांना आरोग्य सुविधा मिळावी, अशा मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या आहेत. मोर्चामध्ये ड्रग अॅक्शन फोरम, नागरिक हितरक्षण मंच, अॅक्शन फॉर इक्विटी, विद्यार्थी संघटना, जागृती महिला मंच आदी संघटनांचा सहभाग होता.