मराठा आंदोलनाचा दक्षिण मुंबईतील व्यवसायांवर परिणाम
29 ऑगस्ट रोजी कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 25,000 हून अधिक समर्थकांसह मुंबईत (mumbai) दाखल झालेल्या मराठा आरक्षण (maratha aarakshan) आंदोलनामुळे शहरातील काही वर्दळीच्या भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे, तर व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे.क्रॉफर्ड मार्केट (crowford market) आणि झवेरी बाजार ते नरिमन पॉइंट आणि फॅशन स्ट्रीटपर्यंत, जिथे सहसा आठवड्याच्या शेवटी खरेदीदारांची गर्दी असते तिथे शुक्रवार 29 ऑगस्टपासून दुकाने सुनसान दिसत आहेत. सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या काळात सामानाची विक्री मोठ्या प्रमाणात होते. तेव्हा या व्यत्ययाचे व्यवसायाला मोठे नुकसान होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.येथील रेस्टॉरंट्स आणि मनोरंजन केंद्रांनाही तितकाच मोठा फटका बसला आहे. नरिमन पॉइंट येथील CR2 मॉलमध्ये वर्ल्ड ऑफ पॅलेट्स नावाचे शाकाहारी रेस्टॉरंट आणि वर्ल्ड ऑफ वाईन्स हे प्रीमियम लिकर स्टोअर चालवणारे भावेश पटेल म्हणाले की, व्यवसायात जवळपास 75 टक्क्यांनी घट झाली आहे.शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस बंद असलेले अनेक व्यवसाय रविवारी आणि सोमवारी पुन्हा सुरू झाले मात्र हवी तशी गर्दी अथवा ग्राहक नसल्याने व्यावसायिकांना तोट्याचा सामना करावा लागला. व्यापारी संघटनांनी सरकारला हा मुद्दा लवकरात लवकर सोडवण्याचे आवाहन केले आहे.या आंदोलनात हिंसाचाराच्या घटनाही घडल्या आहेत. रविवारी संध्याकाळी जुहू (juhu) येथे आंदोलकांनी बेस्ट बसमधील प्रवाशांना मारहाण केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी सायंकाळी 7.15 च्या सुमारास 201 क्रमांकाच्या बसमध्ये एका प्रवाशाला मारहाण केली आणि खिडकीची काच फोडून घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.हेही वाचामहाराष्ट्रासह मुंबईत मुसळधार पावसाची शक्यताअमेरिकेने वाढवलेल्या टॅरीफचा सीफूड उद्योगावर परिणाम
Home महत्वाची बातमी मराठा आंदोलनाचा दक्षिण मुंबईतील व्यवसायांवर परिणाम
मराठा आंदोलनाचा दक्षिण मुंबईतील व्यवसायांवर परिणाम
29 ऑगस्ट रोजी कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 25,000 हून अधिक समर्थकांसह मुंबईत (mumbai) दाखल झालेल्या मराठा आरक्षण (maratha aarakshan) आंदोलनामुळे शहरातील काही वर्दळीच्या भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे, तर व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे.
क्रॉफर्ड मार्केट (crowford market) आणि झवेरी बाजार ते नरिमन पॉइंट आणि फॅशन स्ट्रीटपर्यंत, जिथे सहसा आठवड्याच्या शेवटी खरेदीदारांची गर्दी असते तिथे शुक्रवार 29 ऑगस्टपासून दुकाने सुनसान दिसत आहेत.
सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या काळात सामानाची विक्री मोठ्या प्रमाणात होते. तेव्हा या व्यत्ययाचे व्यवसायाला मोठे नुकसान होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
येथील रेस्टॉरंट्स आणि मनोरंजन केंद्रांनाही तितकाच मोठा फटका बसला आहे. नरिमन पॉइंट येथील CR2 मॉलमध्ये वर्ल्ड ऑफ पॅलेट्स नावाचे शाकाहारी रेस्टॉरंट आणि वर्ल्ड ऑफ वाईन्स हे प्रीमियम लिकर स्टोअर चालवणारे भावेश पटेल म्हणाले की, व्यवसायात जवळपास 75 टक्क्यांनी घट झाली आहे.
शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस बंद असलेले अनेक व्यवसाय रविवारी आणि सोमवारी पुन्हा सुरू झाले मात्र हवी तशी गर्दी अथवा ग्राहक नसल्याने व्यावसायिकांना तोट्याचा सामना करावा लागला. व्यापारी संघटनांनी सरकारला हा मुद्दा लवकरात लवकर सोडवण्याचे आवाहन केले आहे.
या आंदोलनात हिंसाचाराच्या घटनाही घडल्या आहेत. रविवारी संध्याकाळी जुहू (juhu) येथे आंदोलकांनी बेस्ट बसमधील प्रवाशांना मारहाण केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी सायंकाळी 7.15 च्या सुमारास 201 क्रमांकाच्या बसमध्ये एका प्रवाशाला मारहाण केली आणि खिडकीची काच फोडून घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.हेही वाचा
महाराष्ट्रासह मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता
अमेरिकेने वाढवलेल्या टॅरीफचा सीफूड उद्योगावर परिणाम