बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा मुंबईवर परिणाम?

महाराष्ट्रात (maharashtra) काही दिवसांपासून थंडी ओसरली आहे. अनेक भागांत आता उन्हाचा कडाका वाढवला असल्याचं जाणवत आहे. राज्यातील अनेक भागांत गेल्या आठवड्यात दिलेल्या पावसाच्या अलर्टचं संकट आता टळलं आहे. 20 फेब्रुवारी रोजी राज्यातील हवामान कसं राहील हे जाणून घेऊया. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर गेले काही दिवस तापमानचा पारा चढत आहे. सध्या किमान तापमानातही काही अंशांनी वाढ झाल्याचं हवामान विभागानं नोंदवलं आहे. शहरात आज दिवसभर हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. शिवाय कोकण किनारपट्टीवर वातावरणातील वाढत्या आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  मुंबईत (mumbai) आज दिवसभर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहून किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा (low pressure) निर्माण होत आहे. यामुळे देशातील काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा परिणाम दक्षिण तामिळनाडू, केरळसह काही भागांत दिसून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय महाराष्ट्रासह संपूर्ण पश्चिम भारतात तापमानात वाढ झाल्याची नोंद आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 2-3 अंश सेल्सिअसने वाढत आहे. पुणे, सातारा, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातही उकाडा वाढत आहे. किमान तापमान 18-20 अंश सेल्सिअसदरम्यान असून, कमाल तापमान 34-36 अंश सेल्सिअस राहील. पहाटे व रात्री वातावरणात थंडी वाढून दुपारी परत उन्हाची झळ जाणवण्याची शक्यता आहे. दरम्यान, मराठवाड्यात (marathwada) आज दिवसभर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस आहे. तसेच कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस राहणार आहे. शिवाय मराठवाड्यात किमान तापमानात वाढ झाली आहे. 22 अंश सेल्सिअस नोंदवलं जाणार आहे आणि कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे. बंगाल उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु, याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही. आज दिवसभर वातावरण स्थिर राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.हेही वाचा मुंबई ते विजयदुर्ग रो रो फेरी लवकरच सुरू होणार जानेवारी 2026 मध्ये 12.7 कोटींहून अधिक लोकल प्रवाशांची नोंद

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा मुंबईवर परिणाम?

महाराष्ट्रात (maharashtra) काही दिवसांपासून थंडी ओसरली आहे. अनेक भागांत आता उन्हाचा कडाका वाढवला असल्याचं जाणवत आहे.राज्यातील अनेक भागांत गेल्या आठवड्यात दिलेल्या पावसाच्या अलर्टचं संकट आता टळलं आहे. 20 फेब्रुवारी रोजी राज्यातील हवामान कसं राहील हे जाणून घेऊया.मुंबईसह कोकण किनारपट्टीवर गेले काही दिवस तापमानचा पारा चढत आहे. सध्या किमान तापमानातही काही अंशांनी वाढ झाल्याचं हवामान विभागानं नोंदवलं आहे. शहरात आज दिवसभर हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. शिवाय कोकण किनारपट्टीवर वातावरणातील वाढत्या आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईत (mumbai) आज दिवसभर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहून किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा (low pressure) निर्माण होत आहे. यामुळे देशातील काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा परिणाम दक्षिण तामिळनाडू, केरळसह काही भागांत दिसून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय महाराष्ट्रासह संपूर्ण पश्चिम भारतात तापमानात वाढ झाल्याची नोंद आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 2-3 अंश सेल्सिअसने वाढत आहे.पुणे, सातारा, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातही उकाडा वाढत आहे. किमान तापमान 18-20 अंश सेल्सिअसदरम्यान असून, कमाल तापमान 34-36 अंश सेल्सिअस राहील. पहाटे व रात्री वातावरणात थंडी वाढून दुपारी परत उन्हाची झळ जाणवण्याची शक्यता आहे. दरम्यान, मराठवाड्यात (marathwada) आज दिवसभर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस आहे. तसेच कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस राहणार आहे. शिवाय मराठवाड्यात किमान तापमानात वाढ झाली आहे. 22 अंश सेल्सिअस नोंदवलं जाणार आहे आणि कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे.बंगाल उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु, याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही. आज दिवसभर वातावरण स्थिर राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.हेही वाचामुंबई ते विजयदुर्ग रो रो फेरी लवकरच सुरू होणारजानेवारी 2026 मध्ये 12.7 कोटींहून अधिक लोकल प्रवाशांची नोंद

Go to Source