गोंधळी गल्ली परिसरातील गटारी तातडीने पूर्ण करा

परिसरातील नागरिक-वाहन चालकांतून मागणी बेळगाव : कॉलेज रोड, गोंधळी गल्ली या परिसरातील नव्याने गटारी बांधण्यांचे काम सुरू झाले आहे. मात्र हे काम अत्यंत संथगतीने सुरू झाले असून, तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून तसेच वाहन चालकांतून होत आहे. या कामामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. याचबरोबर आदर्श हॉटेलजवळील संपर्क रस्ता देखील बंद ठेवला […]

गोंधळी गल्ली परिसरातील गटारी तातडीने पूर्ण करा

परिसरातील नागरिक-वाहन चालकांतून मागणी
बेळगाव : कॉलेज रोड, गोंधळी गल्ली या परिसरातील नव्याने गटारी बांधण्यांचे काम सुरू झाले आहे. मात्र हे काम अत्यंत संथगतीने सुरू झाले असून, तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून तसेच वाहन चालकांतून होत आहे. या कामामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. याचबरोबर आदर्श हॉटेलजवळील संपर्क रस्ता देखील बंद ठेवला आहे. त्यामुळे वाहन चालकांना वेढा मारुन जावे लागत आहे. तेव्हा तातडीने सीडी वर्क पूर्ण करून गटारी बांधाव्यात, अशी मागणी होत आहे. गेल्या काही वर्षांपासून या परिसरातील गटारी खराब झाल्या आहेत. त्याची दुरुस्ती करावी व काही ठिकाणी नव्या गटारी बांधाव्यात तसेच सीडी देखील नव्याने बांधाव्यात, अशी मागणी होत होती. नगरसेवक शंकर पाटील यांनी पाठपुरावा करून या कामाला मंजुरी मिळवून दिली आहे. त्यानंतर हे काम आता सुरू झाले असून तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. सध्या गटारीमध्ये काँक्रीट घालण्यासाठी लोखंडी जाळी व सळ्या उभे करण्यात आल्या आहेत. त्या सळ्या धोकादायक आहेत. रस्त्याच्या बाजूला चुकून कोणी तरी पडला तर जखमी होण्याची शक्यता आहे. तेव्हा तातडीने खुल्या असलेल्या लोखंडी सळ्यांवर काँक्रीट घालून ते पूर्ण करावे, अशी मागणी देखील करण्यात येत आहे.