आयएमईआर निमंत्रितांच्या बुद्धिबळ स्पर्धेला प्रारंभ

बेळगाव : केएलएस आयएमईआर महाविद्यालय आयोजित दुसऱ्या आयएमईआर चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय बुद्धिबळ स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. स्पर्धेत मानांकित 40 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. आयएमईआरच्या सभागृहात आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आयएमईआरचे डायरेक्टर डॉ. आरिफ शेख, क्रीडा निर्देशक जॉर्ज रॉड्रिक्स, ऑरबिट गिरीष बाचीकर, आकाश मडीवाळर आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते सेंगटी पुढे सरकून बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, धारवाडसह अनेक मानांकित खेळाडूने या स्पर्धेत भाग घेतला आहे. दोन दिवस चालणाऱ्या या बुद्धिबळ स्पर्धेत गुरुवारी अंतिम फेरीचे सामने खेळविले जाणारा असून त्यानंतर बक्षीस वितरण होणार आहे.

Home महत्वाची बातमी आयएमईआर निमंत्रितांच्या बुद्धिबळ स्पर्धेला प्रारंभ
आयएमईआर निमंत्रितांच्या बुद्धिबळ स्पर्धेला प्रारंभ
बेळगाव : केएलएस आयएमईआर महाविद्यालय आयोजित दुसऱ्या आयएमईआर चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय बुद्धिबळ स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. स्पर्धेत मानांकित 40 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. आयएमईआरच्या सभागृहात आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आयएमईआरचे डायरेक्टर डॉ. आरिफ शेख, क्रीडा निर्देशक जॉर्ज रॉड्रिक्स, ऑरबिट गिरीष बाचीकर, आकाश मडीवाळर आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या […]
